बारामती ता. 20. : दुर्गोत्सव 2025 अंतर्गत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने दुर्गोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
या अंतर्गत श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या राजगड, रायगड, प्रतापगड, शिवनेरी,,लोहगड,पन्हाळा,जिंजी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्ण दुर्ग वगैरे बारा किल्ल्याना युनेस्को ने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिली.या शिवदुर्गाना वंदना करण्यासाठी महाविद्यालयातील इतिहास विभागाने पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी उपप्राचार्य व इतिहास विभाग प्रमुख डॉ.शामराव घाडगे,प्रा.दादासाहेब मगर ,प्रा.तुषार जगताप, विभागातील विद्यार्थ्यी उपस्थित होते.