भिगवण दि. 18 प्रतिनिधी : हडपसर, पुणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेमध्ये भिगवण ता.इंदापूर येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य आशिष कुंभार याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले असून त्याची राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धसाठी निवड झाली आहे.
हडपसर पुणे येथे नुकत्याच जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 17 वर्ष वयोगटात 60 ते 65 किलो वजनगटात भिगवण ता.इंदापूर येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य आशिष कुंभार याने जिल्हा स्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले
आदित्य कुंभार याची राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हा स्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत आदित्य कुंभार याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.आदित्य कुंभार यास प्रशिक्षक गणेश घुले यांचे मार्गदर्शन लाभले.
आदित्य कुंभार याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे संस्थेचे सर्व संचालक यांनी अभिनंदन करून राज्य स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. अशी माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुचिता अशोक साळुंके यांनी दिली.







