भिगवण ता. 21 : केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत सह विविध क्षेत्रात यश व पदोन्नती मिळालेल्या मान्यवरांचा झणझणे परिवार व डाळज गावातील ग्रामस्थांचे वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
डाळज गावातील सर्व झणझणे परीवार व ग्रामस्थांच्या वतीने युपीएससी परीक्षेत देशात ११२ रॅंकने यश मिळवलेल्या व जिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या श्री.प्रतिक अनिल जराड यांचा सत्कार ह.भ.प.केशव सोपानराव जगताप यांचे शुभहस्ते पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे एमपीएससी कृषी राज्य सेवा परीक्षेत यश मिळवून कृषि तालुका मंडल अधिकारी (वर्ग-२) या पदावर निवड झालेल्या कु.प्रियांका रमेश झणझणे यांचा पुष्पगुच्छ ,शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे डाळज गावातील श्री.मंगेश हनुमंत जगताप यांचा कारागृह उप अधीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल,श्री.पांडुरंग जगताप यांचे सेवापूर्तीनिमित्त, तसेच श्री.किरण वाकळे यांची मुंबई प्रदेश महानगर प्राधिकरण (MMRDA) मधील महामेट्रोत टेक्निशियन ग्रेड-२ पदावर नियुक्ती झाल्याबद्दल, आणि सर्वश्री.ॠषिकेश दत्तात्रय जगताप,सुरज गाडेकर व महेश भंडलकर यांची पोलीस पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
.सदर प्रसंगी ह.भ.प.श्री.केशवसर जगताप यांनी मार्गदर्शन केले व सर्व यशस्वी तरूणांनी देशातील, राज्यातील , समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पुर्णपणे झोकून देऊन, जाणिवपूर्वक काम करावे, तसेच आई-वडिलांची सेवा करावी.अशी अपेक्षा स्पर्धा परिक्षेत यशस्वी झालेल्या तरूणांकडून व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महाराष्ट्र राज्य जलसंपदा पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे ( शासनमान्य) राज्य उपाध्यक्ष श्री.राजेश झणझणे यांनी केले
.सदर प्रसंगी श्री.राजेंद्र लावर श्री.सुभाष जगताप मा.सभापती पंचायत समिती इंदापूर , अॅडव्होकेट.प्रतिक जगताप व रघुनाथ झणझणे यांची भाषणे झाली.कार्यक्रम प्रसंगी डाळज नं.१,चे सरपंच श्री.महेश जगताप,डाळज नं २च्या सरपंच सौ.शकुंतलाताई जगताप, डाळज नं३चे सरपंच श्री.अमित जाधव यांच्या हस्ते ग्रामपंचायतीचे वतीने सर्व यशस्वीतांचा सन्मान करण्यात आला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत संपुर्ण भारतात ११२ रॅंकने यश मिळवलेले श्री.प्रतिक जराड,व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महिला खुल्या गटातून रॅंक-११ ने यश मिळवलेल्या कु.प्रियांका रमेश झणझणे यांनी आपल्या मनोगतातून आपल्या खडतर प्रवासाचा उलगडा केला.तसेच जिद्द, चिकाटी, उद्दीष्ट साध्य करण्यासाठी दररोज किती व कसा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन नविन पिढीला केले.
कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री.सुभाष झणझणे, रमेश झणझणे, रोहित उर्फ मनोज झणझणे, प्रसाद झणझणे,रोहन झणझणे, सुदेश झणझणे,संदीप झणझणे, सचिन झणझणे, सुनील झणझणे,विजय झणझणे, केदार झणझणे, सतिश झणझणे,अक्षय झणझणे,चैतन्य वाकळे,सौ.आशालता झणझणे,सौ.शुभांगी झणझणे,सौ.शितल झणझणे,राजश्री जगताप,जयश्री झणझणे, अभिषेक झणझणे यांनी खुप परिश्रम घेतले .तसेच मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रम प्रसंगी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मा.चेअरमन व दुध संकलन केंद्राचे संस्थापक श्री.तानाजी जगताप, कृषी सेवा केंद्राचे श्री.संजय जगताप, मनोहर हगारे, ट्रान्सपोर्ट उद्योजक तानाजी जगताप, तुकाराम जगताप, इंदापूर साखर कारखान्याचे मा.संचालक श्री . गजानन जगताप, सुभाष काळे, विठ्ठलराव काळे, राजेंद्र कुंभार,निवृत्ती जगताप, श्रीकांत जगताप, मकरंद जगताप, दत्तात्रय जगताप, बाळासाहेब वाकळे पत्रकार श्री.महेन्द्र काळे, आदि उपस्थित होते..