• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम* *आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

जैन आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जैन समाजाने इंदापूर मध्ये काढला विराट मोर्चा, त्या घटनेचा सूत्रधार पकडण्याची केली मागणी.

जैन धर्मगुरूंना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

जैन आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जैन समाजाने इंदापूर मध्ये काढला विराट मोर्चा, त्या घटनेचा सूत्रधार पकडण्याची केली मागणी.

डॉ. संदेश शहा,  पत्रकार

इंदापूर, ता २१ : कर्नाटक मधील जैन आचार्य श्री १०८ कामकुमार नंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तालुक्यातील सकल जैन समाजाने आज (दि.२०) इंदापूर तालुका बंद ठेवत, इंदापूर तहसील प्रशासकीय भवनावर निषेध मोर्चा काढला. यावेळी खुनी सूत्रधारास तातडीने अटक करावी, खटला जलदगती न्यायालयात चालवून सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, जैन धर्मगुरू तसेच आश्रम, गुरुकुल व संस्थांना पोलीस संरक्षण द्यावे, जैन तीर्थक्षेत्रावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाने समयोचीत पाऊले उचलावीत आदी मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयास देण्यात आले.
सकाळी दहा वाजता संपूर्ण तालुक्यातील सकल जैन श्रावक व श्राविका जुन्या तहसील कार्यालयाजवळ संभाजी चौकातील श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर येथे एकत्र जमले. तेथून शहर मुख्य बाजार पेठ, जुन्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरुन प्रशासकीय भवनासमोर आल्यानंतर मोर्चाचे निषेधसभेत रुपांतर झाले. तेथे ज्येष्ठ पत्रकार डॉ. विकास शहा, श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, भिग वण चे अध्यक्ष महेंद्र बोगावत, संजय रायसोनी, सारिका गांधी, अभय गांधी यांची भाषणे झाली. यावेळी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा, जैन सोशल संघाचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, नितीन शहा, शेखर दोशी,पारसमल बागरेचा, निलेश मोडासे, प्रकाश बलदोटा, महेंद्र गुंदेचा, जवाहर बोरा, डॉ.अनंग मेहता, संजय बोरा, निकिता दोभाडा, महावीर गांधी, हुकुमचंद बोरा, संदीप दोशी, वैभव दोशी, सचिन गांधी, अक्षय दोशी, पंकज दोशी, डॉ.अतुल कोठारी, संतोष व्होरा, विपुल व्होरा, धर्मेंद्र गांधी, स्वप्नील दोशी, अमोल डूडू, अजित दोशी, महावीर शहा यांच्यासह तालुक्यातील सर्वच भागामधील जैन बांधव व भगिनी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. श्रेणिक शहा म्हणाले, अहिंसा तत्वाचे पालन करणारे जैन साधू कधी ही कुणावर हल्ला करत नाहीत, छोटयात छोटया जीवाची देखील हिंसा होवू नये म्हणून ते आचरण करतात. प्रवचनामधून ते राष्ट्र उभारणी, राष्ट्रप्रेम, व्यसनमुक्ती, शाकाहार व अहिंसेचे उद्बोधन करतात. चोवीस तासांतून एकदाच अन्न व जलाचा स्विकार करणा-या अशा धर्मगुरूंची हत्या ही अत्यंत निंदनीय घटना आहे. त्या घटनेमागचा सूत्रधार पकडुन सर्व गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.
मोर्चाच्या निमित्ताने पंतप्रधानांकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना,त्यांना रस्त्यामध्ये असणा-या शाळा वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिक्षण खात्याकडून नियमात सुधारणा करण्यात यावी, जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना काही समाज कंटका कडून जैन गुरूंवर प्राणघातक हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये हजारो धर्मगुरू याचे बळी पडले आहेत. त्यामुळे धर्मगुरूंचा विहार होत असताना प्रत्येक गावाच्या हद्दीपासून ते दुस-या गावाच्या हद्दीपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली असल्याची माहिती डॉ. विकास शहा यांनी केली.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विशाल बोंद्रे म्हणाले, देश विकासात जैन धर्माचे मोठे योगदान असून या दुर्दैवी घटने मुळे जैन समाजावर मोठे धर्मसंकट आले आहे. शासनाने जैन समाजास योग्य न्याय देणे ही काळाची गरज आहे.
—————————————-

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी  म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

*ओंकार नारायण थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त वन्य प्राण्यांसाठी म्हसोबावाडीत पाण्याची व्यवस्था ; सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम*

October 22, 2026
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
23 जुलैला रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे  आयोजन

23 जुलैला रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group