इंदापूर . माजी मंत्री व इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार दत्तात्रय मामा भरणे यांची इंदापूर तालुक्यात विकासाची घोडदौड कायम आहे त्याच अंतर्गत आज आज वडापुरीत शुक्रवारी 18 ऑगस्टला 20 कोटी 70 लाखाच्या विविध विकास कामांची भूमिपूजन व उद्घाटन समारंभ सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार आहे.
या विकास कामांमध्ये पानंद रस्ते सभा मंडपे निधी जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत काँक्रिटीकरण रस्ते नागरी सुविधा अंतर्गत खडीकरण रस्ते दुरुस्ती जलजीवन प्राधिकरण निळ पाणीपुरवठा अशा विविध विकास कामाचे भूमिपूजन उद्घाटन विकास रत्न आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते होणार संपन्न होणार आहे.
तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर भूषवणार आहेत. त्यानंतर लगेचच सहा वाजता जाहीर सभा संपन्न होणार आहे यात श्री भरणे व श्री गारटकर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.