भरणेवाडी येथे हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा व क कलश रोहन सोहळा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
भरणेवाडी येथे आज आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आणि प.पु.गुरुवर्य ह.भ.प.चाळक बाबाजी महाराज यांच्या वेद मंत्रोग्दाने हनुमान मुर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशरोहन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची जय्यत तयारी भरणेवाडी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.
या सोहळ्याच्या निमित्ताने शनिवार पासून भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यामध्ये भजन,किर्तनसेवा,मुर्तीची ग्राम प्रदक्षिणा यासंह हरिनामाचा जयघोष तसेच विविध वेद-मंत्रांचा जप करून आज पहिल्या श्रावण सोमवारी अतिशय भक्तीमय वातावरणात हनुमान मुर्तीची स्थापना करण्यात आली.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे तसेच प.पू.गुरूवर्य ह.भ.प.चाळक बाबाजी महाराज यांच्या शुभहस्ते विविधत शास्त्रोक्त पद्धतीने पुजावहन करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली.तसेच त्यानंतर आमदार भरणे यांनी स्वतः शिखरावर जाऊन कलशरोहन केले.या सोहळ्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह प.पू.गुरुवर्य ह.भ.प.चाळक बाबाजी महाराज,ह.भ.प.श्रीधर महाराज पाटील,प्रतापराव पाटील,श्रीमंत ढोले सर,बाळासाहेब करगळ,बाळासाहेब शिंदे,सरपंच दिपक भरणे,कांतीलाल भरणे,नवनाथ भरणे,बापूराव भरणे,छगन भरणे,आबासो आप्पा भरणे,राजू भरणे,संपत भरणे,दादासो भरणे,विजय भरणे,प्रमोद भरणे यांच्यासह हजारो अबालवृद्ध भाविक भक्त सहभागी झाले होते.
या प्रसंगी बोलताना आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की,आमचे भरणेवाडी गाव आणि परिसरामध्ये आध्यात्माची पहिल्यापासूनच गोडी असुन या भागात असंख्य श्रद्धाळु भाविक भक्त,वारकरी सांप्रदाय, तसेच भजनी मंडळे आपल्या संत महात्म्यांचा वारसा जपत आहेत.त्यामुळेच आजचा हा अतिशय आनंदी असा सोहळा पाड पडत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की,खऱ्या अर्थाने आज संपुर्ण गावामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा अतिशय दिखामदार केला आहे.त्यामुळे हा सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.तसेच काहीकाळ ते भजनात तल्लीन झाले होते.शेवटी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली.