शेटफळगढे .ता २३ : नायलॉन मांजाला बंदी घालून निंबोडी (ता इंदापूर) येथे पतंग स्पर्धा भरवण्यात आली होती . नागपंचमीचे औचित्य साधून निंबोडीचे माजी सरपंच प्रवीण घोळवे यांनी त्यांच्या विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान क्रीडा संकुलात एक आगळीवेगळी पतंग स्पर्धा आयोजित केली होती. गावातील लहान थोर मुलांसोबतच महिला व मुलींनी या स्पर्धेत उत्साह पूर्वक सहभाग नोंदवला.
50 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेमध्ये करण कांबळे यांना प्रथम तर प्रशांत घोळवे व पवन जगदाळे यांनी अनुक्रमे द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला. पवन घमरे, हर्षद ढोले व शिवराज घोळवे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन माजी सरपंच प्रवीण घोळवे यांनी तर व्यवस्थापन माजी सरपंच महादेव घोळवे व ग्रामपंचायत सदस्य नारायण घोळवे यांनी केले. पंच म्हणून पोलीस पाटील मनोज होडशीळ तर सूत्रसंचालन महेश घोळवे यांनी केले. –