शेटफळगढे, ता. 13 : वायसेवाडी (ता इंदापूर)येथील जिल्हा परिषद शाळेचा प्रज्ञाशोध परीक्षेत सुयश मिळवले आहे.या परीक्षेत तालुक्याच्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी बहुमान पटकावला. यापैकी अनिकेत बाळासाहेब तांबे याने तालुकास्तरावर तिसरा क्रमांक मिळवला आहे
पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत बाळासाहेब तांबे (२८८ गुण), तालुक्यात तिसरा, शंभू भागवत माने (२८४ गुण) तालुक्यात पाचवा, चैतन्य संदीप दराडे (२७८ गुण),तालुक्यात आठवा,ऋषिकेश ज्ञानेश्वर भिसे (२७८ गुण) तालुक्यात आठवा, सोहम गंगाधर गरदडे (२७६ गुण) तालुक्यात नववा असे पाच विद्यार्थी आहेत.
ग्रामीण भागात असणारी ही शाळा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत वेगवेगळे उपक्रम राबवित असते.त्याचाच एक भाग म्हणून गुणवत्ता वाढ करण्यासाठी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या इंदापूर तालुका प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ अंतर्गत तालुक्याच्या वेगवेगळ्या शाळेतील इयत्ता चौथीचे २९९५ विद्यार्थी बसले होते.त्
यांचे पेपर १ भाषा व गणित गुण १५०, पेपर २ इंग्रजी व बुद्धिमत्ता गुण १५० गुणांची परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये वायसेवाडी शाळेचे इयत्ता चौथी चे सर्व ३३ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. पैकी २८ विद्यार्थी पात्र झाले आहेत.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ व शिष्यवृत्तीची पूर्वतयारी यासाठी राबविण्यात येत असलेला हा इंदापूर प्रज्ञाशोध पॅटर्न कौतुकाचा आणि आदर्शव्रत उपक्रम ठरत आहे.तालुक्यात पहिल्या दहा मध्ये एकूण 42 विद्यार्थी आहेत त्यापैकी पाच विद्यार्थी आहेत.
वायशेवाडी शाळेचेयशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक अनिल शिंदे यांचे, पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन खुडे, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात तसेच केंद्रप्रमुख नानासाहेब दराडे, शाळेचे मुख्याध्यापक महादेव पवार,शिक्षक कैलास वणवे, राजेंद्र बोरावके,संतोष ननवरे, राजेंद्र शेलार, मारुती दराडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
————