इंदापूर ता. 28 : इंदापूर तालुक्यातील माझा भोई समाज बांधव अत्यंत प्रामणिक असुन मत्स्यमारी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे.त्यामुळे मत्स्यमारी व्यवसायाला भेडसवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण कायम कटीबद्ध असल्याची ग्वाही माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आजोती ता.इंदापूर येथे नारळी पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भोई समाज बांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते उजनी जलाशयामध्ये नारळ वाढवून जलपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला,या प्रसंगी आ.भरणे बोलत होते.ते म्हणाले की,उजनी जलाशयाचा विस्तीर्ण भुभाग आपल्या इंदापूर तालुक्याला लाभला असल्यामुळे समृद्ध शेतीबरोबरच मत्स्यमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर होत असल्या कारणाने हजारो कुटूंबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध असून या भागातील असंख्य भोई समाज बांधवांचा प्रपंच मासेमारीवर अवलंबून आहे.त्यामुळे लवकरच उजनी जलाशयात मोठ्या प्रमाणावर मत्स्यबिज सोडण्यात येणार असल्याची माहितीही आ.भरणे यांनी दिली.
तसेच आपण मत्स्य व्यवसाय विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केल्याने मच्छीमार बांधवांच्या अडी-अडचणी जवळून पाहिल्या आहेत.त्यामुळे मंत्री असताना या विभागाशी संबंधित अनेक चांगले निर्णय घेऊन मच्छीमार बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आजोती सारख्या छोट्या गावाला आतापर्यंत जवळपास २० कोटी रूपयांचा निधी दिला असुन चिंधादेवी ते आजोती रस्त्याचे काम दर्जेदार झाले असल्याने,त्यामुळे गावचा दळण-वळणाचा प्रश्न कायम स्वरूपी सुटला असल्याचे आ.भरणे म्हणाले. त्याचबरोबर कै पै कालिदास दरदरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त आमदार भरणे यांच्या हस्ते कै.पै.कालिदास (दादा) ग्रुपच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार भरणे यांच्यासह पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,सतीश पांढरे,युवक तालुकाध्यक्ष शुभम निंबाळकर,माजी सरपंच संजय दरदरे,प्रकाश शिंदे,नानासाहेब नरूटे,सचिन खामगळ कुंभारगावच्या सरपंच उज्वला परदेशी,युवराज पोळ,उमेश दरदरे,सुरेश दरदरे,पप्पु दरदरे,सागर दरदरे,राहूल दरदरे,उत्तम दरदरे,राहूल भोई,सागर दरदरे,प्रविण दरदरे तसेच कालिदास(दादा) ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.