शेटफळगढे, ता २९ : शेटफळ गढे (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत भिगवण – बारामती रस्त्यावरुन जाणाऱ्या मोटरसायकल स्वाराला शेटफळगढे (ता इंदापूर) च्या हद्दीत सोमवारी 28 ऑगस्टला भर दिवसा साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकी स्वराला मोटरसायकल आडवी लावली. व गळ्याला चाकू लावून दोन अज्ञात चोरट्यांनी 82 हजार रुपये लुटल्याची घटना घडली.
भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लामजेवाडी (ता इंदापूर) येथील संतोष बाळासो निगडे हे 28 ऑगस्टला साडे अकराच्या सुमारास घरी येत असताना त्यांच्या मोटरसायकलला शेटफळगढे येथील खडकवासला कालव्या नजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर पाठीमागून येणाऱ्या दोन अनोळखी चोरट्यांनी फॅशन कंपनीची मोटरसायकल आडवी लावली व संतोष निगडे यांच्या गळ्याला एकाने चाकू लावला व निगडे यांच्या खिशातील ८२ हजार रुपयांची रोकड काढून घेतली
याबाबतची तक्रार भिगवण पोलिसात दिली आहे या संदर्भात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खाडे करीत आहेत