इंदापूर ता.15 : प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजना पूर्वी महसूल विभाग मार्फत राबवण्यात येत होती व त्यांना कृषी व ग्रामविकास विभाग मदत करत होता व नवीन शासन निर्णय जून 2023 नुसार जमीन आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार महसूल विभाग यांना देण्यात आलेला आहे. मयत असलेबाबत दाखले ग्रामविकास विभागाने देणे इतर सर्व कामे कृषी विभाग कडे आलेली आहेत.प्रधान मंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत तालुक्यातून दिनांक 11/9/2023 अखेर 3815 लाभार्थी Ekyc व 3720 लाभार्थी आधार प्रमाणीकरण किंवा बँक खाते आधार ला जोडणे प्रलंबित आहेत कृषी विभाग मार्फत कॅम्प आयोजन करून, व प्रत्येक गावात बैठका घेऊन ,वारंवार पाठपुरावा करूनही लाभार्थी Ekyc व आधार प्रमाणीकरण करणार नाहीत असे लाभार्थी यांना पोर्टल वरून कमी करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांना भविष्यात सदर योजनेचा लाभ मिळणार नाही .सध्या मयत,एकाच कुटुंबातील पती व पत्नी लाभ घेत आहेत,आयकर भरणारे,जमीन नसणारे , संपर्क होत नाही किंवा गावात नाहीत, संपर्क करूनही आजारी असल्याने ekyc करत नाहीत ,बाहेर गावी असणे यामुळे Ekyc व आधार प्रमाणीकरण करण्यास येत नाही.संपर्क होत नसलेले व संपर्क करूनही ekyc करत नाहीत असे 80 गावातील 742 व मयत शेतकरी 1061 पोर्टल वरून कमी करण्याची कार्यवाही कृषी विभाग मार्फत करण्यात येत आहे .तसेच उर्वरित गावातील जे शेतकरी ekyc व आधार प्रमाणीकरण किंवा बँक खाते जोडणी करणार नाहीत असे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून कमी करण्याची कार्यवाही पुढील 4-5 दिवसात करण्यात.येणार आहे तरी तालुक्यातील पात्र शेतकरी यांनी ekyc व बँक खाते आधार शी जोडण्याची कार्यवाही करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी केले आहे.