इंदापूर ता.19 : इंदापूर तालुक्यातील १६ गावांतील कोतवाल भरतीसाठी गुरुवारी २१ सप्टेंबर रोजी इंदापूर येथील तहसील कार्यालयात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या गाव गावच्या कोतवालांची गाव कामगार तलाठ्यांना महसूल प्रशासनाची कामे गाव पातळीवर करत असताना मदत होत होती मात्र तालुक्यातील या 16 गावांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोतवाल नसल्याने ही पदे रिक्त होती. त्यामुळे त्या गावच्या गाव कामगार तलाठ्यावर कामांचा ताण पडत होता. परिणामी महसुली कामकाजावरही याचा परिणाम होत होता. त्यामुळे ही पदे भरण्याची मागणी होत होती.
तालुक्यातील रिक्त असणाऱ्या गावांची नावे पुढीलप्रमाणे- शेटफळगढे, निरगुडे, भिगवण, तक्रारवाडी, इंदापूर हिंगणगाव, वरकुटे बुद्रुक, नीरनिमगाव, रेडा, खोरोची, व्याहळी, शेळगाव, कळस, निंबोडी, कुरवली काझड या गावातील रिक्त जागेवर कोतवालपदाची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार गुरुवारी इंदापूर येथील प्रशासकीय भवनमध्ये सोडतीचे आयोजन केले आहे.