शेटफळगढे (प्रतिनिधी)क र्मवीर अण्णांकडे गोरगरीब मुलांप्रती संवेदना होती,ही संवेदना आपण सगळ्यांनी जपली पाहिजे असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव बी एन पवार यांनी केले
रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालय व जुनी कॉलेज शेटफळगढे ता. इंदापूर जि. पुणे विद्यालयाच्या कर्मवीर जयंती कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकरराव वाबळे हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून गणेश भोसले, जनरल बॉडी सदस्य हनुमंतराव वाबळे स्कूल कमिटी सदस्य मानसिंग वाबळे, अनिल वाबळे, सरपंच राहुल वाबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष वाबळे, केंद्रप्रमुख नानासाहेब दराडे, प्राचार्य जितेंद्र गावडे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कु पुनम झगडे हीची उपशिक्षणाधिकारी तर कु किरण खोमणे हीची सहाय्यक कृषी संचालक म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच एस एस सी परीक्षेत प्रथम क्रमांक आलेबद्दल सोनवणे कुटुंब व मानसिंग वाबळे यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली.यावेळी रांगोळी स्पर्धा उद्घाटन व वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सहसचिव बी एन पवार पुढे म्हणाले की, कर्मवीर अण्णांनी परिस्थितीवर मात केली तो आदर्श आपण घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी ज्ञान आणि आरोग्य याकडे लक्ष द्यायला हवे.
तसेच व्याख्याते गणेश भोसले यांनीही कर्मवीर यांच्या जीवनातील प्रसंग सांगितले.
कु पूनम झगडे, कु किरण खोमणे, केंद्रप्रमुख नानासाहेब दराडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव वाबळे यांनी विद्यालयाच्या भौतिक सुविधांसाठी ग्रामस्थ योगदान देतील हा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक जितेंद्र गावडे यांनी केले तर आभार सुभाष लकडे यांनी मानले.
सूत्रसंचालन एन डी दराडे, डॉ काशिनाथ सोलनकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद व सेवकांनी परिश्रम घेतले.
चौकट –
कर्मवीर जयंती निमित्त कर्मवीरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी यावेळी पारंपारिक वेशभूषा केली होती. तर विद्यार्थांना जयंती निमित्त स्नेहभोजन देण्यात आले.