• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन* म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण* *कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित* *म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन* *युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

कवयित्री व लेखिका वर्षाताई ननवरे यांचा बालसाहित्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

कवयित्री व लेखिका वर्षाताई ननवरे  यांचा बालसाहित्य पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न

पुणे: सावरकर भवन अध्यासन केंद्र , कर्वे रोड,डेक्कन येथे कवयित्री व लेखिका वर्षा रवींद्र ननवरे यांचा ‘कवितेच्या अंगणात’ हा काव्यसंग्रह व ‘प्राण्यांच्या राज्य, या कथासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे सुप्रसिध्द कवयित्री व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका डॉ. संगीता बर्वे ,सुप्रसिद्ध कवयित्री व संपादक वर्षा तोडमल व सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. प्रतिमा प्रकाशनाचे प्रकाशक दीपक चांदणे सरांनी दोन्ही संग्रहाच्या निर्मिती विषयी सांगितले . ज्योत्स्ना चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना वर्षाताई म्हणाल्या बालकांची वैचारिक बैठक,त्यांच असलेलं भावविश्व ,दृष्टिकोन,मानसिकता, आकर्षिक करणाऱ्या गोष्टी इ. केंद्रस्थानी ठेवून या साहित्याची निर्मिती केली आहे. बालकांना प्राण्यांचे आकर्षण जास्त असते याचा विचार करून या साहित्यातील कविता व कथा प्राण्यांभोवती गुंफलेल्या आहेत.डॉ. संगीता बर्वे यांनी अध्यक्षीय भाषण करताना म्हणाल्या की या पुस्तकातील भाषा ही अत्यंत साधी सोपी आहे जेणे करून बालकांच्या आकलन क्षमते पलीकडे न जाता त्यांना पचेल रुचेल आशा प्राथमिक स्वरूपाची आहे.तसेच डॉ.वर्षा तोडमल आपल्या मनोगतात म्हणाल्या, की असे बाल साहित्य निर्माण होणे आवश्यक आहेत व ते बालकांच्या हाती वाचायला देणे खूप महत्त्वाचे आहे. एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं तयार करणं आणि ती त्यांना वाचायला मिळणं ही एक आंनदाची पर्वणीच आहे. हे उत्कृष्ठ काम वर्षाने केले आहे.
हा प्रकाशन कार्यक्रम साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे व कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध कवी धनंजय तडवळकर यांनी आयोजित केला. या प्रसंगी कवी संमेलन घेण्यात आले त्यात साधारण 21 कवीनी कवितांचे सादरीकरण केले. विलास कुवळेकर ,हनुमंत चांदगुडे, शशिकांत तिरोडकर,सतीश कुलकर्णी ,मिनाक्षी नवले, सुनिता टिल्लू ,अशोक भांबुरे, अस्मिता चांदणे,सुचिता कदम, वासंती वैद्य, स्वाती दाढे, वैजयंती आपटे, आरुषी दाते, लता कोंडे, मीना सातपुते, ज्योती सरदेसाई अंजली देसाई, भरती भगत
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध कवी रमण रणदिवे , निरूपमा महाजन , चिन्मयी चिटणीस , सतीश गयावळ, प्रीती धापटे ,रवींद्र ननवरे आदी उपस्थित होते .सर्व उपस्थित मान्यवरांनी वर्षाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री ऋचा कर्वे व कवी विजय सातपुते यांनी केले

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

*बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 12 व 13 डिसेंबर रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन*

December 11, 2025
म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

म्हसोबाचीवाडी येथे सोमवारी 17 नोव्हेंबरला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

November 15, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले इंदापुरातील कृषी यांत्रिकीकरणाला नवे बळ , इंदापूर तालुक्यात ५१ अनुदानित ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित ८ यंत्र आणि औजारांचे वितरण*

October 22, 2025
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हसोबावाडी ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न कायमचा केला दूर , नवीन 100 केव्हीचे रोहित्र झाले कार्यान्वित*

October 21, 2025
म्हसोबावाडीत 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान यशवंतरायाचा उत्सव

*म्हसोबावाडीत यशवंतरायाच्या उत्सवाचे 22 ते 24 ऑक्टोबर रोजी आयोजन*

October 21, 2025
*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

*युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या शिवरायांच्या शिवदुर्गांना वंदना देण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या इतिहास विभागाच्या वतीने पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन*

October 19, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

आमदार दत्तात्रय भरणे यांनी अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नांना यश

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group