पुणे: सावरकर भवन अध्यासन केंद्र , कर्वे रोड,डेक्कन येथे कवयित्री व लेखिका वर्षा रवींद्र ननवरे यांचा ‘कवितेच्या अंगणात’ हा काव्यसंग्रह व ‘प्राण्यांच्या राज्य, या कथासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे सुप्रसिध्द कवयित्री व साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका डॉ. संगीता बर्वे ,सुप्रसिद्ध कवयित्री व संपादक वर्षा तोडमल व सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. प्रतिमा प्रकाशनाचे प्रकाशक दीपक चांदणे सरांनी दोन्ही संग्रहाच्या निर्मिती विषयी सांगितले . ज्योत्स्ना चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना वर्षाताई म्हणाल्या बालकांची वैचारिक बैठक,त्यांच असलेलं भावविश्व ,दृष्टिकोन,मानसिकता, आकर्षिक करणाऱ्या गोष्टी इ. केंद्रस्थानी ठेवून या साहित्याची निर्मिती केली आहे. बालकांना प्राण्यांचे आकर्षण जास्त असते याचा विचार करून या साहित्यातील कविता व कथा प्राण्यांभोवती गुंफलेल्या आहेत.डॉ. संगीता बर्वे यांनी अध्यक्षीय भाषण करताना म्हणाल्या की या पुस्तकातील भाषा ही अत्यंत साधी सोपी आहे जेणे करून बालकांच्या आकलन क्षमते पलीकडे न जाता त्यांना पचेल रुचेल आशा प्राथमिक स्वरूपाची आहे.तसेच डॉ.वर्षा तोडमल आपल्या मनोगतात म्हणाल्या, की असे बाल साहित्य निर्माण होणे आवश्यक आहेत व ते बालकांच्या हाती वाचायला देणे खूप महत्त्वाचे आहे. एका शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं तयार करणं आणि ती त्यांना वाचायला मिळणं ही एक आंनदाची पर्वणीच आहे. हे उत्कृष्ठ काम वर्षाने केले आहे.
हा प्रकाशन कार्यक्रम साहित्यदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे व कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध कवी धनंजय तडवळकर यांनी आयोजित केला. या प्रसंगी कवी संमेलन घेण्यात आले त्यात साधारण 21 कवीनी कवितांचे सादरीकरण केले. विलास कुवळेकर ,हनुमंत चांदगुडे, शशिकांत तिरोडकर,सतीश कुलकर्णी ,मिनाक्षी नवले, सुनिता टिल्लू ,अशोक भांबुरे, अस्मिता चांदणे,सुचिता कदम, वासंती वैद्य, स्वाती दाढे, वैजयंती आपटे, आरुषी दाते, लता कोंडे, मीना सातपुते, ज्योती सरदेसाई अंजली देसाई, भरती भगत
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध कवी रमण रणदिवे , निरूपमा महाजन , चिन्मयी चिटणीस , सतीश गयावळ, प्रीती धापटे ,रवींद्र ननवरे आदी उपस्थित होते .सर्व उपस्थित मान्यवरांनी वर्षाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री ऋचा कर्वे व कवी विजय सातपुते यांनी केले