शेटफळगढे : रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय व ज्युनि.कॉलेज शेटफळगढे विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्राचार्य जितेंद्र गावडे, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुभाष लकडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.ए पी जे अब्दुल कलाम यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी शहाजी वाघमारे,अनुराधा भागवत यांनी ए पी जे अब्दुल कलाम यांच्या विषयीची माहिती सांगितली. तर कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा यावेळी घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे केली. डॉ काशिनाथ सोलनकर लिखित ‘वाचन प्रतिज्ञा’ यावेळी घेण्यात आली.प्राचार्य जितेंद्र गावडे यांनी यावेळी वाचनाचे व ग्रंथप्रदर्शनाचे महत्व सांगितले.
ग्रंथप्रदर्शनात ७ हजार ग्रंथ ठेवण्यात आले होते. यावेळी रयत इंग्लिश मेडीयमच्या विद्यार्थ्यांसह सहाशे विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले.तर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल उज्ज्वला जाधव यांनी केले
—————————————-.
फोटो ओळ – वाचन प्रेरणा दिनानिमित्त श्री नागेश्वर विद्यालय शेटफळगढे विद्यालयात ग्रंथ प्रदर्शन घेण्यात आले.