पुणे दि.२८ अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने भिगवण आणि परिसरात २५ नूतन शाखा उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला. सकाळी ९.०० वाजलेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल १६ नूतन शाखांचे उदघाटन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले. शेटफळगडे येथील दुपारच्या सभेमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोढरे साहेब यांनी उपस्थित जनसमुदायाला आरक्षण, तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी संघटनेच्या नूतन पदाधिकारी यांना निवडीचे पत्र देण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी ज्ञानदेव(माऊली)भोसले यांची नियुक्ती करण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी गुलाबदादा गायकवाड, संयुक्त सरचिटणीस अतिष गायकवाड युवक अध्यक्ष, अतिशगायकवाड.राष्ट्रीय युवक प्रतिनिधी किशोर गिराम पाटिल विभागीय संघटक राजकुमार मस्कर, पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड पांडूरंग जगताप तसेच नूतन पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते
मराठा समाजामध्ये समाजाचा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा समाजाचे विविध प्रश्न असो यावर वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम ज्ञानदेव(माऊली) भोसले हे करीत आहे. संघटनेच्या ध्येय धोरणावरच काम करणार असून मराठा समाजाच्या युवक-युवतींना व बांधवांना एकत्र आणून समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचे काम करनार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.संघटनेच्या आदेशाप्रमाणे मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उन्नती व्हावी यासाठी तण,मन धनाने काम करणार असल्याचे ही त्यांच्याकडून सांगण्यात आले.या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदनाच वर्षाव होत आहे.