.इंदापूर ता.22 : अकोले व काझड तालुका इंदापूर गावच्या शिवेवर दोन शेतकरी नदी जोड प्रकल्पाच्या बोगद्यात अडकले आहेत त्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर ती सध्या सुरू आहे परंतु रात्र व अंधार झाला असल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत.
तावशी ते भादलवाडी दरम्यान नदी जोड प्रकल्पांतर्गत नीरा आणि भीमा नदी जोड प्रकल्पाचा बोगदा आहे या बोगद्यात दोन शेतकरी उतरत असताना बोगद्यातील पाण्यात पडले त्यांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे.
सध्या या बोगद्यातील पाणी कमी झाले असून इंदापूर तालुक्यातील काझड येथील हे दोन शेतकरी खाली उतरत होते. दोघेही शेतकरी आत कोसळले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे परंतु अंधारामुळे मदत व बचाव कार्यात अडचण येत होती मात्र वीस त्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांनी लाईटची व्यवस्था केली आहे. तसेच वायरमन हजर आहेत.