शेटफळगढे,ता 7 : यंदा पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थितीत इंदापूर तालुक्यात उसाचे उत्पादन घटल्याच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांमध्ये उसाची पळवापळवी होत असल्याचे चित्र आहे मात्र उसाच्या टंचाईमुळे कधी नव्हे ते शेतकऱ्यांना चांगले दिवस आले असून आता साखर कारखान्यांना उसासाठी शेतकऱ्यांच्याच मागे लागण्याची वेळ आली आहे.
आजवर शेतकऱ्यांना आपला ऊस गाळप करण्यासाठी साखर कारखान्याच्या पाठीमागे लागावी लागत होते मात्र कारखान्यावरती हेलपाटे मारूनही ऊसाला दोन-तीन महिने तोडी येत नव्हत्या. आता मात्र दुष्काळाच्या परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे साखर कारखान्याने आपल्या कारखान्याला जास्तीत जास्त ऊस यावा यासाठी जवळपास 2 हजार 700 ते 3 हजार 300 रुपये पर्यंत प्रति टनाला उसाचा दर यावर्षी पहिला हप्ता म्हणून देत आहेत. हा हप्ता देऊनही शेतकरी राजा आता जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्याला ऊस देत असल्याने प्रत्येक कारखान्याचे शेतकी कार्यालयातील कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावरती जात आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने यावर्षीच्या साखर कारखान्याच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकरी राजा बनला आहे. यावर्षी देखील पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे यावर्षी देखील लागणी झालेल्या नाहीत त्यामुळे या हंगामा बरोबरच पुढील वर्षीच्या हंगामात देखील वसाचे क्षेत्र हे कमी राहणार आहे त्यामुळे पुढील वर्षी देखील शेतकरी हा राजा बनणार आहे जो कारखाना जास्त भाव देईल त्या कारखान्यालाही पुढील वर्षी ऊस गाळपासाठी कारखान्याला देणार आहेत त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आगामी दोन वर्षेही अच्छे दिन म्हणून राहणार आहेत.
—————————————–