इंदापूर ता.9 : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून चालू झाले असून पुरवणी बजेट मध्ये इंदापूर तालुक्यातील 11 रस्ते व 4 पूल बांधकाम तसेच इंदापूर तालुक्यातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशहवली बाबा दरगाह च्या सुशोभीकरण साठी सुमारे 108 कोटींचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री व आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने हा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले
इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या अशा रस्त्यांकरिता हा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये खाली रस्त्यांचा समावेश आहे
शेळगाव ते व्याहाळी रस्ता 2 कोटी , वडापुरी ते काटी रस्ता 12 कोटी, सराटी ते गिरवी रस्ता 6 कोटी, इंदापूर शहर हद्द ते गलांडवाडी बनकरवाडी वरकुटे रस्ता 5 कोटी, इंदापूर नॅशनल हायवे रस्ता ते बेडशिंगे रस्ता 8 कोटी 50 लाख, बोरी ते लासुरणे रस्ता 7 कोटी, शेळगाव ते निमसाखर रस्ता 16 कोटी ,शेळगाव ते भरणेवाडी रस्ता 5 कोटी 50 लाख, चव्हाण रणमोडे वस्ती ते कुरवली रस्ता 1 कोटी, भाटनिमगाव बेडशिंगे बाभूळगाव रस्ता 1 कोटी ,चाकाटी ते बोराटवाडी ते महादेव मार्ग रस्ता 3 कोटी तसेच कुंभारगाव ते पोंधवडी ते शेटफळगढे या रस्त्यावरील 4 पुलांच्या कामाकरिता 3 कोटी निधी मंजूर झाला असून इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे व हजरत चांदशहवली बाबा दरगाह च्या सुशोभीकरण साठी सुमारे 38 कोटींचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.