इंदापूर ता. 23 : इंदापूर येथील हिंदू मुस्लिम धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत चाँद शाहवली बाबांच्या उरुस निमित्त राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी हजरत चाँद शाहवली बाबांच्या दर्ग्यावर चादर चढवून दर्शन घेतले.
भाजपचे पदाधिकारी ,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उरूस कमिटीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी रेवडी खरेदी करून नागरिकांना रेवडीच्या प्रसादाचे वाटप स्वतः केले तसेच नागरिकांशी संवाद साधला.