इंदापूर ता. 23 : निरगुडे येथील बाळासाहेब पानसरे यांची भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिणच्या कार्यकारणी समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री पानसरे यांनी यापूर्वी भाजपचे तालुका सरचिटणीस पद संजय गांधी निराधार योजनेच्या समितीचे सदस्य पद या पदावर ती काम केले आहे पूर्वीपासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना बढती देत जिल्हा कार्यकारणी समिती सदस्य पदी श्री पानसरे यांची नियुक्ती केली आहे.
याबाबतचे लेखी पत्र पुणे जिल्हा भाजपाच्या बैठकीत पुणे येथे शहर कार्यालयात पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी सरचिटणीस शेखर वडणे आकाश कांबळे लोकसभा संयोजक जालिंदर कामठे पश्चिम महाराष्ट्र कार्यालय मंत्री योगेश बाचल नवनाथ पडळकर यांच्यासह मंडलाध्यक्ष सरचिटणीस मोर्चा अध्यक्ष कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.