शेटफळगढे ,ता 9 : स्वच्छतेचे दूत म्हणून आपल्या गावामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना पंढरीच्या वारकऱ्याप्रमाणे त्यांना मदत करावी असे आवाहन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला महाविद्यालय, यांच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन निरगुडे (ता इंदापूर) येथे करण्यात आले होते उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या शिबिरामध्ये लोकसंख्या नियंत्रण जन जागृती, विशेष उपक्रम, वृक्षारोपन ,स्वच्छ भारत अभियान, मतदार नाव नोंदणी, अक्षय उर्जा वापर जनजागृती, आरोग्य विषय मार्गदर्शन याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन हे विद्यार्थी करणार आहेत विद्यार्थ्यांनीही गावच्या विकासासाठी असलेल्या योजना व त्याची संधी ग्रामस्थांच्या लक्षात आणून द्यावे त्याचबरोबर महापुरुषांचे विचार पोचवण्याचे कामही या माध्यमातून करावे तसेच शिक्षण व्यवस्थेचे महत्त्व पटवून देण्याचे कामही करावे त्याचबरोबर गावांमधील स्वच्छता देखील करून स्वच्छतेचे महत्व ग्रामस्थांना पटवून देण्याचे काम हे विद्यार्थी करणार आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
हे शिबिर .६ जानेवारी २०२४ ते .१२ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये चालणार आहे .कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीधर धस होते पराग जाधव, अशोकराव शिंदे, गौरी प्रदिप सोनवणे, हनुमंतराव काजळे, दत्तू वणवे, अनिल भोसले, औदुंबर दराडे, बायडा खंडाळे, सुषमा पवार, चतुराबाई लकडे, देवेंद्र राऊत, लताबाई रणधीर,ब्रह्मदेव केकाण, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दशरथ कुदळे यांनी तर आभार अनिल बनसोडे यांनी मानले.