इंदापूर ता.20 : देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांची 23 मार्च रोजी सकाळी दहा वाजता इंदापूर शहरातील जुन्या बाजार समितीच्या मैदानात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. तरी या सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केले आहे.
या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,आमदार संग्राम थोपटे,आमदार संजय जगताप उपस्थित राहणार आहेत.
यावेळी बोलताना श्री पाटील पुढे म्हणाले, , मागील दहा वर्षांमध्ये भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आले. दहा वर्षात केलेल्या घोषणांपैकी एकही घोषणा आहे सरकार पूर्ण झाली नाही. पूर्वी तीनशे रुपयांना मिळणारा सिलेंडर आता अकराशे रुपये झाला. पूर्वी 50 रुपये लिटर असणाऱ्या पेट्रोलने शंभरी पार केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करून युवकांना नोकरी देऊ अशा अनेक घोषणा फसव्या घोषणा दिल्या प्रत्यक्षात काहीच केले नाही. भारत सरकारने देशात स्थापन केलेल्या कंपन्या विकण्याचे काम या भाजप सरकारकडून केले आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे त्यामुळे गोरगरीब जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे
आज देशात आणि राज्यात भाजपा विरोधात मोठा रोष तयार झाला आहे. शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली याचा रोष दिसून येतो. या सर्व बाबींवर मार्गदर्शन करण्यासाठी माजी कृषिमंत्री शरद पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या 23 मार्चला या शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत
या पत्रकार परिषदेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, राज्याचे कार्यकारणी सदस्य अमोल भिसे, ज्येष्ठ नेते अशोक घोगरे,,विकास खिलारे,दादासाहेब थोरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.