बारामती ता. 27 : LIC ने नव्याने हाती घेतलेल्या जीवन समर्थ प्रोजेक्ट मध्ये संजय घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी बारामती शाखेतून जवळपास 1000 एजंट मधून एकमेव संजय घोरपडे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या निवडीबद्दल व प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती देताना घोरपडे यांनी सांगितले , “या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण भारतातून ठराविक एजंट, ठराविक डेव्हलपमेंट ऑफिसर, तसेच ठराविक ब्रांच मॅनेजर यांची निवड करून त्यांच्याकडून भविष्यात LIC मध्ये हवे असणारे बदल याविषयी मते जाणून घेणार आहेत. या प्रोजेक्ट वरती देशपातळीवर मुख्य 8 ते 10 अधिकारी काम करत आहेत व एकूण 15 महिन्यांसाठी हा प्रोजेक्ट चालणार आहे. या निमित्ताने नुकतीच मुंबईमधील मंत्रालया शेजारील LIC चे पूर्ण भारताचे मध्यवर्ती कार्यालय असलेल्या ‘योगक्षेम’ येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
यामध्ये ग्राहकांची LIC बद्दलची मते तसेच अपेक्षा, LIC प्रॉडक्ट बद्दल ग्राहकांच्या दृष्टीने हवे असणारे बदल, एजंट बद्दलच्या समस्या, अडचणी या विषयांवर सविस्तरपणे चर्चा झाली. 15 महिन्यानंतर याचा सविस्तर अहवाल सादर झाल्यानंतर त्यानुसार भविष्यकाळात LIC मधील बदल पाहायला मिळतील.