• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*कोणत्याही सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी उपलब्ध होण्यासाठी* *स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे तातडीने प्रस्ताव दाखल करावेत यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सूचना*आमदार दत्तात्रय भरणे यांची माहिती*

*शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने सुरु करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विभागाला निर्देश दिले असल्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले*

अखेरीस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे पाऊल पडते पुढे…..

मुंबई ता. 3 : गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजनांसारख्या सार्वजनिक कामांसाठी विनामूल्य जमिनी मिळविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शेती विकास महामंडळाकडे विहित नमुन्यात तातडीने प्रस्ताव दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

तसेच अत्यावश्यक बाब म्हणून शेती महामंडळाच्या जमिनीवरील पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लावण्यासाठी अटी व शर्थींच्या अधीन राहून पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेती महामंडळ जमिनी असलेल्या गावांना गावठाण विस्तार वाढ,तसेच घरकुले आणि अन्य शासकीय योजना राबविण्यासाठी मोफत ग्रामपंचायतीना जमिनी मिळाव्या म्हणून पाठपुरवा केला होता

त्या अनुषंगाने आज
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शेती विकास महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयातील उपमुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार दीपक चव्हाण, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अभिषेक कृष्णा, पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे (व्हिसीद्वारे), पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील (व्हिसीद्वारे), महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नाशिकचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, शेती महामंडळाच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी रुपाली आवळे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील कळंब, वालचंदनगर, लासुर्णे, अंथुर्णे, भरणेवाडी, जंकशन , रणगाव आनंदनगर, निमसाखर गावांसह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी राज्य शेती महामंडळाच्या जमिनी आहेत. या जमिनी ज्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये आहेत, अशा ग्रामपंचायतीकडून गावठाण विस्तार, शासकीय घरकुल योजना, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा योजना या सार्वजनिक प्रयोजनांच्या कामासाठी जमीन मागणीचे प्रस्ताव वारंवार प्राप्त होतात. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे मार्यादित उत्पन्न लक्षात घेता त्यांना सार्वजनिक कामांसाठी जमिनी विनामूल्य उपलब्ध करुन देण्याबाबतचा शासन निर्णय दि. 13 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आला. या शासन निर्णयानुसार ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक कामांसाठी जमिनींची आवश्यकता आहे, त्यांनी तातडीने विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करावेत. त्यावर संबंधित यंत्रणेने तात्काळ निर्णय घ्यावेत. तसेच पाणी पुरवठा योजनेचे निकष लक्षात घेता काही अटी व शर्थींच्या अधिन राहून पाणी पुरवठा योजनांची कामे सुरु करण्याची परवानगी देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योंजनांकरिता महामंडळाची जमीन उपलब्ध करु देण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

ग्रामपंचायतींना गावठाण विस्तार अंतर्गत ग्राम सचिवालय, जलजीवन मिशन अंतर्गत पेय जल योजना, केंद्र व राज्य शासनाच्या मान्यता प्राप्त घरकुल योजना, सौरऊर्जा पॅनल, घनकचरा व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, स्मशानभूमी, दफनभूमी, क्रीडांगण, रस्ते आदी सार्वजनिक उपक्रमांसाठी प्राधान्याने देण्यातबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिले

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
“इंद्रामाई” ग्रुप कडून देहू नगरीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छता जनजागृती व  पथनाट्याचे सादरीकरण

"इंद्रामाई" ग्रुप कडून देहू नगरीत तुकोबांच्या पालखी सोहळ्यात स्वच्छता जनजागृती व पथनाट्याचे सादरीकरण

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group