भिगवण दि. 14 वार्ताहर: भिगवण ता.इंदापूर येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य आशिष कुंभार याने जिल्हा स्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला असून विभाग स्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
आदित्य कुंभार याने आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत 61 ते 65 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळविला असून हडपसर पुणे येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्य कुंभार यास प्रशिक्षक गणेश घुले यांचे मार्गदर्शन लाभले.
आदित्य कुंभार याच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.चंद्रकांत खानावरे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे संस्थेचे सर्व संचालक यांनी अभिनंदन करून विभाग स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या असे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुचिता अशोक साळुंके यांनी सांगितले








