इंदापूर – लिंबराज माध्यमिक विद्यालय निरगुडे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जुने मित्र मैत्रीण त्यांच्यासोबत शिकत असताना घडलेले गमतीशीर किस्से शिक्षण घेत असताना काढलेल्या खोड्या अशा साऱ्या आठवणींना उजाळा देत आठवणीत रमले विद्यार्थी औचित्य होते विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे. या सोहळ्यासाठी दहावीतील २००२ ०३ च्या बॅचचे तब्बल एकूण 40 विद्यार्थी उपस्थित होते.सर्व मित्र मैत्रिणींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत सर्वांना हसवले.
कार्यक्रमाची सुरुवात दैनंदिन परिपाठ घेऊन झाली.सर्व गुरुजनांचे पूजन आणि औक्षण करून मान्यवर व्यासपीठावर विराजमान झाले.उपस्थित सर्वांनीच आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी जुन्या आठवणींना ताजे करीत लिंबराज माध्यमिक विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचा वर्ग देखील भरला होता यावेळी प्राथमिक विभागाचे माजी शिक्षक श्री वाघ सर, श्री दराडे सर, यांनी विद्यार्थ्यांना काही जुन्या आठवणी सांगत आपले मनोगत व्यक्त केले तर माध्यमिक विद्यालयाचे श्री खंडागळे सर, मोरे सर,वाबळे सर, भोसले मॅडम, मुंडे सर,तांबे सर,घुले सर, यांनीही आम्ही विद्यार्थ्यांना कसे घडवले याबाबत मनोगत व्यक्त केले तर दराडे गुरुजी यांनी गीतगायन केले.
कार्यक्रमामध्ये आदरणीय मोरे गुरुजींना विशेष श्रद्धांजली वाहण्यात आली.सूत्रसंचालन जयश्री पानसरे, जयश्री खाडे, व दत्तात्रय ननवरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती पानसरे यांनी मानले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडावा यासाठी प्रयत्न केले. विशेषतः विद्या कुंभार,दीपक राऊत, सागर साळुंके, दत्तात्रय ननवरे, अरविंद शिंदे,यांनी खूप प्रयत्न केले.








