पुणे ता. 28 : पुणे येथे रविवार दिनांक 27 ऑगस्ट 2023 रॊजी आम्ही सिद्ध लेखिका , पुणे जिल्हा यांच्या कडून ” श्रावणरंग ” हा कार्यक्रम संपन्न झाला .
श्रावणरंग या कार्यक्रमाच्या वेळी पुणे विभागाच्या सर्व पदाधिकारी ज्योत्स्ना चांदगुडे, मीना शिंदे, कल्पना देशपांडे, सविता इंगळे, वैशाली मोहिते आणि प्रार्थना सदावर्ते उपस्थित होत्या. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. जयश्री कोतवाल यांनी सरस्वती वंदन केले.
यानंतर प्रार्थनाताई सदावर्ते यांनी ज्योत्स्नाताई चांदगुडे यांच्या ‘विठूमय’ हे पुस्तक स्वतः तयार करून आणले या बातमीने ज्योत्स्नाताईंना आणि सर्वानाच सुखद धक्का दिला. त्या पुस्तकाच्या प्रती आम्ही सिद्ध लेखिका संस्थेच्या सर्व मैत्रिणींना विनामूल्य देण्यात आल्या.
या प्रसंगी प्रार्थनाताई सदावर्ते यांनी मनोगत व्यक्त केले .
आज आम्ही सिद्ध लेखिका संस्थेचा रजिस्ट्रेशन अनुसार दुसरा वर्धापनदिन होता आणि त्याच दिवशी म्हणजे २७ ऑगस्टला श्रावणरंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा दुग्धशर्करा योगच आहे
अध्यक्ष ज्योत्स्नाताई चांदगुडे यांनी प्रास्ताविकात संस्था वर्धिष्णू व्हावी ही प्रत्येक सभासदाची जबाबदारी आहे त्यासाठी सर्वजणींचा सहभाग आवश्यक आहे हे सांगितलेच पण उपक्रम, संमेलनाचे आयोजन कसे करता येईल याविषयी सख्यांशी संवाद साधला.
आजच्या ‘श्रावण रंग’ कार्यक्रमात एक आनंददायी घटना अशी की आज ज्योत्स्नाताई चांदगुडे यांच्या ‘विठूमय’ पुस्तकाचे प्रकाशन झाले या पुस्तक प्रकाशनाची सर्व जबाबदारी संस्थेच्या संचालक प्रार्थनाताई सदावर्ते यांनी घेतली होती. आज या श्रावणरंगात भक्तीरंग मिसळला गेला. त्याबद्दल ज्योत्स्नाताईंनी पुस्तकाविषयी आणि प्रार्थनाताई विषयी कृतज्ञता व्यक्त केली .
पुणे विभागाने आयोजित केलेल्या ‘ श्रावणरंग ‘ कार्यक्रमात एकूण ६ गटांनी सहभाग नोंदवला. ते गट पुढील प्रमाणे
१) निसर्गसख्या – चिन्मयी चिटणीस, एकता कारेगावकर, ऋचा कर्वे, प्रज्ञा भारस्वाडकर यांनी
कवी नलेश पाटील यांच्या भावगर्भ निसर्ग कविता सादर केल्या .
२) रिमझिम – राजश्री सोले, साधना शेळके, जयश्री श्रोत्रिय, शुभदा जोशी, संजीवनी कुलकर्णी यांचा पावसाची रूपं उलगडून दाखवणारा हा कार्यक्रम. कार्यक्रमाचा समारोपही पर्जन्य प्रार्थनेने केला.
३) आनंदयात्री – ज्योत्स्ना तानवाडे, वैजयंती आपटे, राधिका भांडारकर, उज्ज्वला सहस्त्रबुद्धे, कुंदा कुलकर्णी यांनी जीवनरसाचा आनंद घेणाऱ्या बा. भ. बोरकरांच्या कवितेतून माणूस कवी आणि निसर्ग कवी बा. भ. बोरकर उलगडून सांगितले.
४) आनंद यात्री – ज्योती सरदेसाई, मनीषा आवेकर, प्रतिभा पवार,सुनिता टिल्लू,मीनाक्षी नवले यांनी कवयित्री संजीवनी मराठे यांच्या अलवार कविता सादर केल्या.
५) अथांग समूह – आरुषी दाते लीना दामले, वासंती वैद्य, अश्विनी जगताप यांनी कवितातून सागराची असलेले मानवी भावबंध उलगडून दाखवळे . लीना दामले यांची ‘अवकाश सागर’ कविता लक्षवेधी ठरली.
६) बाईपण भारी देवा – सविता इंगळे, मीना शिंदे, वैशाली मोहिते डॉ. जयश्री कोतवाल आणि प्रज्ञा मिरासदार यांनी स्त्री जाणिवांच्या स्वरचित कविता सादर केल्या.
या श्रावण रंग कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले.