भिगवण ता.4 . महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीरश्री मालोजी राजेभोसले यांची ऐतिहासिक गढी इंदापूर शहरामध्ये आहे सदर गढीचे बांधकाम पूर्णता मोडकळीस आलेले होते त्याबाबत इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमींनी यापूर्वी अनेक वेळा शासन व राजकीय नेते यांच्याकडे पाठपुरावा करूनही सदर गढीची दुरुस्ती केलेली नव्हती फक्त शासनाने राजकारण म्हणून प्रत्येक वेळी सदर गढीची दुरूस्ती करणेची मंजुरी मिळाली आहे अशी पोकळ आश्वासने इंदापूर तालुक्यातील दोन्ही माजी मंत्री महोदयांनी तालुक्यातील जनतेला आश्वासनं देऊन गढी वरून राजकारण चालू केलेले होते व आहे परंतु अद्याप सदर गढीचे संवर्धनाचे कोणतेही काम चालू झालेले नव्हते ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र राज्याचे मंत्रि मा. मंगलप्रसाद लोढा साहेब यांनी हि सदर गढीच्या संवर्धनाबाबत पोकळ आश्वासन दिले होते याचीही कोणताही पूर्तता झालेली नाही एकदरीत शासनाची फार गरीबी चालू आहे असे आमचे निदर्शनात आलेले आहे.
असे असताना सध्या पावसाळ्याचे दिवस असताना दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे गढीचा असलेला बुरुज ढासळलेला आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमींच्या मनावर फार मोठा आघात झालेला असून राज्य शासनाच्या विरुद्ध फार मोठा संताप जनतेमध्ये आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शिवप्रेमी जनतेने मा. तहसीलदार साहेब इंदापूर यांना लेखी पत्र देऊन सदर गढीची दुरुस्ती श्रमदानातून करण्यास परवानगी मिळावी असे निवेदन दिलेले आहे सदर बाबीला अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करतो तसेच भविष्यामध्ये शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर सदर श्रमदानाच्या कामांमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे तन मन धनाने सहभागी होतील. तसेच शासनाने गढी दुरुस्ती करायची नसलेस पुढें अशा प्रकरची कोणताही घोषणा करु नये अन्यथा मराठा महासंघ राज्यकर्त्यांना इंदापूर तालुक्यात पाय ठेऊ देणार नाही.. असे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून भिगवन पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक श्री दिलीप पवार यांना अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आलेले असून सुदर निवेदनाच्या प्रति माननीय मुख्यमंत्री माननीय .मंत्री मंगल प्रसाद लोढा .मा. जिल्हाधिकारी पूणे.मा. तहसीलदार इंदापूर यांना देण्यात आलेले आहेत .. सदर वेळी ॲड.पांडुरंग जगताप ,राजकुमार मस्कर ,शंकरराव गायकवाड, प्रशांत गायकवाड. अशोकराव साळुंखे. सुभाष फलफले भरत मोरे सुनील काळे अजिंक्य माडगे रणजीत जाधव विशाल धुमाळ हर्षवर्धन ढवळे दत्तात्रय जाधव अमोल जगदाळे अभयसिंह राजेभोसले संदीप गुंडाळे अभि जगदाळे सुहास भोसले .विलासराव झांजूर्णे ग्रंथपाल दादा रणसिंग हे उपस्थित होते