इंदापूर, ता २२: इंदापूर तालुक्यात नदी जोड प्रकल्प अंतर्गत खोदण्यात आलेल्या निरा भिमा बोगद्यात 22 नोव्हेंबरला अकोले ता इंदापूर या गावाच्या हद्दीत शेतकरी पडले होते या पडलेल्या काझड येथील दोन शेतकऱ्यांचे मृतदेह रात्री साडेअकरा वाजता बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.
इंदापूर तालुक्यातील काझड व अकोले गावच्या सीमेवर असलेल्या नदी जोड प्रकल्पांतर्गत खोदण्यात आलेल्या बोगद्याच्या शाफ्ट नंबर चार मध्ये दोन शेतकरी आपल्या विद्युत पंपाचे पाहणी करण्याकरता गेले असता पडले या घटनेमध्ये काझड ( ता इंदापूर जि पुणे) येथील रतिलाल बलभीम नरुटे वय वर्ष ५० अनिल बापूराव नरुटे वर्ष ३५ हे दोन शेतकरी मृत्युमुखी पडले आहेत
22 नोव्हेंबरला रात्री साडेअकरा वाजता या दोन शेतकऱ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे
सुमारे २७४ फूट हा बोगदा खोल असल्याने तपास कार्यास वेळ लागला , इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना बचाव कार्यासाठी यंत्रणा कामाला लावण्याच्या सूचना दिल्या होत्या. घटना घडल्यापासून जवळपास व रात्री एक वाजेपर्यंत श्री भरणे हे अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. मदत करायची माहिती घेत होते व या बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना व संपर्क करून स्वतः उपलब्ध करून देत सतत मदत कार्याचा आढावा घेत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच अनिकेत भरणे,विजय काळे, यांची मदतकार्यातस प्रशासनाला मदत झाली
——————-