• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सपकळवाडी ठरले जिल्ह्यात अव्वल….*

आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली शाबासकीची थाप.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सपकळवाडी ठरले जिल्ह्यात अव्वल….*

इंदापूर ता. 11 : गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावाने पुणे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावत सन 2019 – 20 सालचा पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मिळविला आहे.या निमित्ताने नुकतेच आमदार दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते पुरस्कार व पाच लक्ष रूपयांचे बक्षिस सपकळवाडी ग्रामस्थांकडे सुपुर्द करण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब सपकळ,सरपंच रोहिणी तानाजी सोनवणे,माजी सरपंच शिवाजी सपकळ,शिवाजी बापु सपकळ,अनिल सपकळ,सुदर्शना भुजबळ मॅडम,जमादार सपकळ तुषार सपकळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,युवक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांनी ग्रामस्थांचे कौतुक करताना सांगितले की,खऱ्या अर्थाने गावकऱ्यांची एकजुट व सामुहिक प्रयत्नामुळे सपकळवाडी गाव जिल्ह्यात प्रथम आले असून या छोट्याशा गावाने आपापले घर,दार,अंगण तसेच परिसर स्वच्छ व सुंदर ठेवत संपुर्ण गावाला आदर्शवत बनवले असल्याचे आ.भरणे म्हणाले.तसेच आपण सपकळवाडी गावात विकासाच्या बाबतीत कोट्यावधी रूपयांचा निधी दिला असल्याने विकासकामात हे गाव तर अग्रेसर आहेच,परंतु शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्यासाठी सरपंच रोहिणी सोनवणे,उपसरपंच सचिन सपकळ तसेच इतर सर्व कार्यकर्ते तळमळीने प्रयत्न करत असतात.या गावाला व वाड्यावस्त्यांना जोडणारे मुख्य रस्ते पुर्णत्वास गेले आहेत.तसेच गावांतर्गत असणाऱ्या सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे,या ठिकाणी जलसंधारण,ओढा खोलीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली असल्याने पाण्याची नैसर्गिक उपलब्धता आहे‌.

त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची २४ तास सोय,प्राथमिक शाळा,प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आदींची सुविधा अतिशय उत्तम असल्यामुळे सपकळवाडी गाव खऱ्या अर्थाने बाकी खेड्यांसाठी एक विकास मॉडेल ठरले असल्याचे गौरवोद्गार आमदार भरणे यांनी काढत ग्रामस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.तसेच यापुढेही सपकळवाडीला निधीची कमतरता भासू देणार नाही,हा विश्वासही आमदार दत्तात्रय भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.

सामुदायिक प्रयत्नामुळे सपकळवाडी गाव प्रथम – सचिन सपकळ
गेल्या दहा वर्षापासून सपकळवाडी गावामध्ये आमुलाग्र बदल झाला असून मी सरपंच असताना आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळवून दिला आहे.तसेच प्रत्येक योजना गावामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो.सोबतच गावच्या विकासासाठी आमदार भरणे मामा लागेल तेवढा निधी मंजूर करत असतात.त्यामुळे आमच्या गावाला सर्वच बाबतीत सौंदर्य प्राप्त झाले आहे.म्हणून या स्पर्धेचे सर्व निकष पार करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत आम्ही प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे श्री.सपकळ यांनी सांगितले.याशिवाय हा पुरस्कार मिळविण्यामध्ये सर्व ग्रामस्थांचे तर योगदान आहेच.परंतु यामध्ये खास करून आमदार भरणे मामांचे विशेष मार्गदर्शन व त्यांच्या माध्यमातून भरभरून निधी मिळाल्यानेच आम्हाला हा पुरस्कार मिळाला असल्याची माहिती देत सचिन सपकळ यांनी सपकळवाडी करांच्या वतीने आमदार दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले आहेत.
या स्पर्धेत भोर तालुक्यातील ससेवाडी गावाने दुसरा क्रमांक व शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी गावाने तिसरा क्रमांक पटकावला आहे‌.

एकूणच सचिन सपकळ यांच्या नेतृत्वाखाली सपकळवाडी सारखे छोटेसे गाव आज खऱ्या अर्थाने नावारूपाला आले असून शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ गावातील शेवटच्या माणसाला मिळवून देण्यासाठी श्री.सपकळ हे तळमळीने मेहनत घेत आसतात.तसेच आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली ते तालुक्यात मिळेल ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाचे नेहमीच तालुकाभर कौतुक होत असते.आता त्यांनी पुढाकार घेत आपल्या गावाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवून दिले आहे.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
राज्यातील जिल्हा परिषदेच्या 19 हजार 460 पदां साठी अर्ज करण्यास उरले दोन दिवस

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना विधानसभेनंतरच मुहूर्त ?

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group