इंदापूर : . १३ डिसेंबर 2023 रोजी दुपारी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी जाहीर केले. यावेळेस सर्व समाजाला, सर्व घटकांना, विविध क्षेत्रातील युवकांना कार्यकारणी मध्ये स्थान देत न्याय देण्याचा प्रयत्न अंकिता पाटील ठाकरे यांनी केला आहे.
काल दुपारी कार्यकारणी जाहीर केल्यानंतर लगेचच या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अंकिता पाटील ठाकरे यांनी घेतली. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रिया नारायणराव पवार हे देखील उपस्थित होत्या. यावेळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन, युवा मोर्चा शाखांचे उद्घाटन, प्रवास दौरा इत्यादी गोष्टींवरती यावेळी चर्चा करण्यात आली.
अंकिता पाटील ठाकरे यांची युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दिवसापासूनच कामाला सुरुवात केली होती. त्याच प्रकारे नवीन कार्यकारणी देखील त्याच जोशामध्ये एकत्रित घेत त्यांनी पक्ष संघटनेचे काम हातात घेतले आहे.