• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक* *डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार* भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*भिगवण येथे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला*

*भिगवण येथे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान राजमाता जिजाऊ व्याख्यानमाला*

भिगवण ता.13 : मराठा महासंघ भिगवण शाखा व छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवानिमित्त राजमाता जिजाऊ व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲड. पांडुरंग जगताप, इंदापूर तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर व भिगवण शाखाध्यक्ष छगन वाळके भिगवण शहर अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी दिली.

व्याख्यानमालेचे हे २३वे वर्ष असून समाज प्रबोधन व त्यातून समाज परिवर्तनाचा वसा जपणारी महाराष्ट्रातील नामवंत व्याख्यानमाला म्हणून या व्याख्यानमालेकडे पाहिले जाते. १४ ते १८ फेब्रुवारी २०२४ दरम्यान भिगवण येथील जुन्या शिवरत्न मंगल कार्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या या व्याख्यानमालेत उत्कृष्ट व दर्जेदार वक्त्यांची अखंडित परंपरा याही वर्षी चालू ठेवण्यात आली आहे.

अकोला येथील कवी अनंत राऊत हे ‘कवी मनाच्या सामाजिक भावना’ या विषयावर, पुणे येथील ममता सपकाळ ह्या ‘माय…, ही मायच असते!’ या विषयावर, बारामती येथील चांडाळ चौकडी वेब सिरीजचे भरत महाराज शिंदे हे ‘चला…, संस्कार मूल्य जपूया….!’ या विषयावर, सारथीचे डॉ. विलास पाटील हे ‘शिक्षण म्हणजे सुखी जीवनाचा मूलमंत्र’ या विषयावर तर राष्ट्र सेवादल पुणेचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष वारे हे ‘बाबासाहेब सर्वांचे’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांचे हस्ते आणि अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने काढण्यात येत असलेल्या “पुढचे पाऊल” या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन होत असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

व्याख्यानमालेतील प्रत्येक पुष्पाचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे भिगवणच्या सरपंच दीपिका क्षीरसागर, बारामती येथील वैद्यकीय सल्लागार डॉ. कीर्ती पवार, भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर व बारामती येथील उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर हे उपस्थित राहणार आहेत. व्याख्यानमालेचा समारोप पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक बापूसाहेब खराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी
परिसरातील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अ. भा. मराठा महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे..

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून  पटकावले रौप्य पदक*

*आदित्य कुंभार याने पुणे विभागीय शासकीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून पटकावले रौप्य पदक*

September 23, 2026
*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

*डॉ. सचिनकुमार नांदगुडे यांना राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार*

September 10, 2026
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
मा. अनिल जी. मेहेर यांना ‘मा .बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरिअल लाईफटाईम अचिव्हमेंट अँवार्ड’ जाहीर

मा. अनिल जी. मेहेर यांना 'मा .बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ मेमोरिअल लाईफटाईम अचिव्हमेंट अँवार्ड' जाहीर

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group