अंथुर्णे ता १ -श्री छत्रपती हायस्कूल अंथुर्णे,या केंद्रावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले या परीक्षा आनंददायी वातावरणात पार पडण्यासाठी केंद्र संचालक. श्री. धापटे. बी.एस. यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर जे परीक्षक आहेत त्यांनाही तशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि सर्व परीक्षार्थींना परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .या केंद्रावर एकूण परीक्षार्थी 302 असून या केंद्रामध्ये श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव, महात्मा फुले विद्यालय निमगाव केतकी ,रणगाव हायस्कूल रणगांव, दगडू दादा विद्यालय गोतंडी, मॉडर्न हायस्कूल शेळगाव, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि छत्रपती हायस्कूल अंथुर्णे या शाळेतील विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत
.केंद्र संचालक श्री धापटे.बी.एस.सर शाळेचे मुख्याध्यापक श्री. खांडेकर. एन.एस.सर आणि बिल्डिंग कंडक्टर श्री. शिंगाडे एस .व्ही .सर त्याचबरोबर सर्व पर्यवेक्षक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून आनंददायी वातावरणामध्ये परीक्षेस सुरुवात झाली.