इंदापूर ता.1 : आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नांना मोठं यश आले आहे गेले कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या व हजारो शेतकरी ग्रामस्थांना फायदा होणाऱ्या
उजनी धरणाच्या जलाशयावरील शिरसोडी ते कुगाव दरम्यान होणार सर्वात मोठा पूल होणार आहे यासाठी लवकरच निधीची ही तरतूद होणार आहे श्री भरणे यांच्या मागण्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या फुलाच्या कामासाठी निधी देण्याची विधिमंडळात घोषणा केली आहे.
आमदार दत्तात्रय भरणे यांनी आमदार झाल्यापासून विकासकामांचा नुसता झपाटा चालवला आहे.एकेकाळी इंदापूर तालुक्यामध्ये विकासाची वाणवा होती,गावा-गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती,विकासकामांच्या अभावामुळे गावशिवारातील खेडो-पाड्यांना बकालपण आले होते.मात्र आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या ८-१० वर्षाच्या काळात इंदापूरसाठी हजारो कोटींचा निधी आणून तालुक्याचे रूप पुर्णपणे पालटवले आहे.आज प्रत्येक गावात करोडो रूपयांचा निधी श्री.भरणे यांच्या माध्यमातून मिळाला असून निधीचा ओघ अजूनही सुरूच आहे.
इकडे विकासाची कामे प्रगतीपथावर आणल्यानंतर आमदार भरणे यांनी तालुक्यातील शेतीच्या पाण्याकडे आपला मोर्चा वळवत कोणाच्याही मनी-ध्यानी नसणारी व अशक्यप्राय वाटणारी लाकडी-निंबोडी उपसा जलसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले,मात्र इंदापूरकरांच्या हक्काचे ५ टीएमसी पाणी त्यांनी मिळवून दिले.ही योजना फळाला आल्यामुळे आमदार भरणे यांची शासन दरबारी असणारी ताकद या निमित्ताने उभ्या तालुक्याला पहायला मिळाली.
निरा नदीवर आमदार भरणे यांनी निर-निमगाव,बोराटवाडी,खोराची आणि तावशी येथे कोट्यावधींचे पुल मंजूर केले असून या माध्यमातून माळशिरस आणि फलटण तालुके इंदापूर तालुक्याशी जोडल्याने बाजारपेठ वाढणार आहे.
त्याच धर्तीवर असाच एखादा पूल उजनी धरणावर करण्याविषयी त्यांनी बोलून दाखविले होते.परंतु उजनी धरणाचे विस्तीर्ण पात्र बघता एवढा मोठा पुल बांधणे सुरवातीला अनेकांना आव्हानात्मक वाटत होते.मात्र आमदार दत्तात्रय भरणे यांची काम करण्याची जिद्द आणि चिकाटी बघता त्यांना या कामातही सहज यश साध्य करता आले.परवाच आमदार भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शिरसोडी ते कुगाव ता.करमाळा यांना जोडणारा पूल मंजूर करण्याची विनंती केली होती.तसेच श्री.पवार यांनीही या बाबत इंदापूर वासियांना आश्वस्त केले होते.
त्यानुसार आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार दत्तात्रय भरणे यांनी तालुकावासियांना गोड बातमी दिली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या पुलाच्या कामासाठी प्लॅन इस्टीमेट बनवण्याचे निर्देश दिले असून वर्षभरात सदरील पुलाच्या कामास प्रत्यक्ष सुरवात करण्याचा शब्द श्री.पवार यांनी दिला
आमदार भरणे म्हणाले की
या पुलामुळे इंदापूर तालुक्यातील नागरिकांचा दळण-वळणाचा प्रश्न तर सुटणार आहेच मात्र त्याच बरोबर इंदापूरच्या बाजारपेठेत मोठी व्यापार वृद्धी येणार आहे.तसेच उजनी जलाशय लगतच्या गावांमध्ये छोटे-मोठे व्यवसाय वाढीला लागणार असून हजारो तरुणांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.भरणे यांनी दिली.
—————————————
*दत्तामामांचे आभार मानावे तितके कमी…बॅक वॉटर परिसरातील गावांमधून आनंद व्यक्त*
आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरसोडी ता.इंदापूर ते कुगाव ता.करमाळा दरम्यान उजनी जलाशयावर पुल बांधण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्याने या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून अशा प्रकारचा पूल आमच्याकडे मंजूर होईल असं आमच्या स्वप्नातही कधी वाटले नव्हते,मात्र आमदार भरणेमामांनी आमच्यासाठी काल पर्यंत स्वप्नवत वाटणारे काम आज प्रत्यक्षात उतरवले आहे.त्यामुळे आम्ही भरणेमामांचे कायमस्वरूपी ऋणी राहणार असल्याच्या भावना ग्रामस्थांनी यावेळी बोलून दाखविल्या..