इंदापूर ता. 10 : आमदार दत्तात्रय भरणे यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात मतदार संघात 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पळसदेव दुपारी चार वाजता काटी व सायंकाळी सहा वाजता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या जाहीर सभा होणार आहे.. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांना तालुक्यातील नेते सोडून गेले तरी सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या जोरावर खासदार सुप्रिया सुळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी मोठ्या हिमतीने जिद्दीने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोट पुन्हा एकदा बांधली आहे. अशातच तालुक्यातील जनतेमध्ये पवार साहेबांविषयी आपुलकीचे व सहानुभूतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे याचा फायदा खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत निश्चितच होणार आहे.
त्यानिमित्तानेच इंदापूर तालुक्यात असलेल्या चांगल्या वातावरणात मतदारांमध्ये आणखी उत्साह निर्माण व्हावा. याकरिता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ विविध राजकीय नेत्यांच्या सभांना तालुक्यात सुरुवात झाली त्यानिमित्ताने आमदार रोहित पवार यांची पहिली जाहीर सभा अंथुरणे या ठिकाणी होत आहे.
आमदार रोहित पवार हे राज्यातील अभ्यासू व आक्रमक नेते ओळख म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सभांना राज्यात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. ते सविस्तरपणे आपल्या भाषणात महायुतीच्या केंद्र व राज्यातील सरकारवर आक्रमकपणे प्रत्येक मुद्द्याचे सविस्तर विश्लेषण करून महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण निर्मिती करीत असतात.
त्याचाच प्रत्येक इंदापूर येथे 23 मार्च रोजी झालेल्या शेतकरी मेळाव्यात इंदापूर तालुक्यातील जनतेला आला या मेळाव्यात त्यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडले. व सभा गाजवली.
आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मतदार संघात 12 एप्रिल रोजी पळसदेव काटी अंथुरणे या तीन ठिकाणी होणाऱ्या सभांची तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी तयारी केली आहे या निमित्ताने श्री पवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर काय बोलतात ? याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मात्र या निमित्ताने तालुक्यात होणाऱ्या श्री पवार यांच्या या सभामुळे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करीत असलेल्या तालुक्यातील युवक वर्गामध्ये व मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.