इंदापूर ता. 15 : जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे 16 एप्रिल रोजी इंदापूर येथे उ शरदचंद्रजी पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाने अजित पवार गटाला धक्का मानला जात आहे. अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.
कारण आप्पासाहेब जगदाळे व त्यांचे प्रवेश करणारे सहकारी हे कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते.मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून श्री जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पासून दूर गेले . व राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात प्रचार केला होता. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांचा विजय झाला.
याशिवाय श्री जगदाळे हे 2019 पासून कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. बाजार समिती ही त्यांनी पक्षविरहित पॅनल द्वारे लढवली होती त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत इंदापुरात नुकत्याच झालेल्या शेतकरी मेळाव्यालाही ते उपस्थित नव्हते.
त्यामुळे श्री जगदाळे हे 2019 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते. त्यामुळे त्यांनी 16 एप्रिल ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला तरी तो अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटासाठी धक्का होऊ शकत नाही.
याउलट महायुतीच्या जोरावर मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा विजय मात्र यापूर्वीच पक्का झाला झाला आहे. त्यामुळे इंदापुरात कोण आले गेले याला फारसे महत्त्व नाही. त्यामुळे श्री जगदाळे यांचा प्रवेश हा अजित पवार गटाला धक्का होऊ शकत नाही. असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.