वालचंदनगर ,ता.9 : येथील श्री. वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत तब्बल २७ वर्षांनी इ. १० वी च्या संपूर्ण बॅच चे व इ. १२ वी च्या संपूर्ण बॅचचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.
या स्नेह मेळाव्यास १७० विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. जुन्या मित्र मैत्रीणीना भेटताना त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. रविवारी दि. २८ एप्रिल रोजी श्री. वर्धमान विद्यालय च्या प्रांगणात भव्य दिव्य मंडपात हा सोहळा साजरा करण्यात आला. माजी शिक्षक शिक्षिका व शिपाई यांचे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या व झेंडूच्या फुलांनी वर्षाव करत हलगी च्या पारंपारिक वाद्याने शिक्षकांना फेटा बांधून जंगी स्वागत करण्यात आले.
अतिशय दिमाखदार सुरुवात कार्यक्रमाची करण्यात आली . ड्रोनच्या माध्यमातून व व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफर कडून या सर्व आनंदमय वातावरणाचे क्षण टिपून घेतले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे विद्यमान चेअरमन श्री. मकरंद वाघ व व्हा. चेअरमन श्री. प्रशांत महामुनी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वालचंदनगर पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष अधिकारी श्री. विक्रम साळुंखे साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांना आमंत्रित केले होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. हनुमंत कुंभार सर व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक श्री. निकम सर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्या बद्दल सर्वांचे आभार मानले
विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील केलेल्या गमतीजमती ची मजा सांगितली. आलेल्या सर्व मान्यवरांना चहा नाश्ता दुपारचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन त्या बॅच मधील विद्यार्थी श्री. पंकज पाटील प्रास्ताविक श्री. प्रशांत पाटकळे व निरोप समारंभ रूपा पुरंदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दशरथ नागरगोजे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी श्री. गणेश जगताप श्री. स्वप्निल कंदले श्री. राहुल निंबाळकर श्री. स्वप्निल अचलारे श्री. विनोद मोरे श्री. विनोद माने श्री. विपुल व्होरा श्री. दत्ता पवार अनिता ढोपे, सारिका शहा वर्षा काळे व फरिदा जमादार यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे या शाळेत शिकणारे विद्यार्थी श्री. दिपक रासकर श्री. पंकज पाटील श्री. राहुल निंबाळकर हे याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .
शिल्लक राहिलेल्या रक्कम पैकी शाळेसाठी 6 नग ऑफिस खुर्च्या ( chairs ) सप्रेम भेट दिल्या. त्या बद्दल शाळेचे प्राचार्य श्री.हनुमंत कुंभार सर यांनी आभार मानले.