• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्दैवी घटनेस जबाबदार असलेल्या जलसंपदा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची व या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत देण्याची मागणी

राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

तुषार झेंडे पाटील, यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

पुणे ता. २३ : उजनी धरणात दि. २१ मे सायंकाळी ५ वा. बोट उलटून झालेल्या दुर्दैवी घटने बाबत जबाबदार असलेल्या जलसंपदा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत करावी अशी मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये उजनी धरणाच्या पात्रामध्ये दिनांक २१ मे २०२४ रोजी सायंकाळी ५:०० वा. सुमारास करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील कळाशी असा उजनी जलाशय पात्रामध्ये प्रवास करत असताना सदरची प्रवासी बोट वादळी वाऱ्यामुळे उलटली आणि बोटीतील सर्व सात प्रवासी बुडाले फक्त एका प्रवाश्याने पोहून स्वतःचा जीव वाचवला, आणि त्यांनतर या गंभीर घटनेची सर्वाना माहिती दिली.

त्यांनतर महसूल, पोलीस, प्रशासन NDRF यांचे मदतीने बचाव कार्य सुरु होते २३ रोजी बुडालेल्या सर्वांचे मृतदेह सकाळी मिळून आले. सदरच्या दुर्दैवी घटनेस केवळ जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी सोलापूर व पुणे (महसूल) प्रशासन जबाबदार आहे.

उजनी जलाशयामध्ये कोणालाच बोटिंग / नौकाविहाराची परवानगी नसताना गेली अनेक वर्षापासून सदर ठिकाणी प्रवाशी बोट चालवली जाते, पूर्णपणे बेकायदेशीर आहे, यामध्ये कोणत्याच सुरक्षिततेच्या उपाययोजना नाहीत, इतर ठिकाणाहून भंगारात खरेदी केलेल्या बोटी या ठिकाणी वापरल्या जातात, एकाही बोटीमध्ये लाईफ जाकेट नाही, सदरच्या प्रवासी बोटीमध्ये लाईफ जाकेट असते तर सहा लोकांचा जीव वाचला असता.

सन २०१७ मध्ये देखील अशीच बोट उलटून ६ डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झाला होता केवळ दोन्ही जिल्हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे सदरची घटना घडली आहे, केवळ गौण खनिजासाठीच प्रशासन हक्क दाखवते का ? कार्यकारी अभियंता उजनी धरण व्यवस्थापन यांचेवर सदरच्या बेजबाबदारपणा बाबत कायदेशीर कारवाई करण्यात यावी. उजनी जलाशयामध्ये सर्व अनधिकृत बोटिंग / नौकाविहार तत्काळ बंद करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

सदरची दुर्दैवी घटना जलसंपदा विभागाच्या उजनी धरणाच्या जलाशयात प्रशासनाच्या दुर्लक्षाने घडली असल्याने शासंच्या वतीने गरीब कुटुंबियांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची मागणी तुषार झेंडे पाटील यांनी प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई व प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करा -आमदार दत्तात्रय भरणे

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group