• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद* *खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा* *अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?* *ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात* *उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार* *भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

वालचंदनगर मध्ये 27 वर्षानंतर श्री वर्धमान महाविद्यालयात भरला दहावीचा वर्ग

वालचंदनगर मध्ये 27 वर्षानंतर श्री वर्धमान महाविद्यालयात भरला  दहावीचा वर्ग

वालचंदनगर ,ता.9 : येथील श्री. वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेत तब्बल २७ वर्षांनी इ. १० वी च्या संपूर्ण बॅच चे व इ. १२ वी च्या संपूर्ण बॅचचा स्नेह मेळावा आयोजित केला होता.

या स्नेह मेळाव्यास १७० विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.‌ जुन्या मित्र मैत्रीणीना भेटताना त्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. रविवारी दि. २८ एप्रिल रोजी श्री. वर्धमान विद्यालय च्या प्रांगणात भव्य दिव्य मंडपात हा सोहळा साजरा करण्यात आला. माजी शिक्षक शिक्षिका व शिपाई यांचे गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या व झेंडूच्या फुलांनी वर्षाव करत हलगी च्या पारंपारिक वाद्याने शिक्षकांना फेटा बांधून जंगी स्वागत करण्यात आले.

अतिशय दिमाखदार सुरुवात कार्यक्रमाची करण्यात आली . ड्रोनच्या माध्यमातून व व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफर कडून या सर्व आनंदमय वातावरणाचे क्षण टिपून घेतले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे विद्यमान चेअरमन श्री. मकरंद वाघ व व्हा. चेअरमन श्री. प्रशांत महामुनी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वालचंदनगर पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष अधिकारी श्री. विक्रम साळुंखे साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांना आमंत्रित केले होते.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. हनुमंत कुंभार सर व ज्युनिअर कॉलेज चे शिक्षक श्री. निकम सर यांनी मनोगत व्यक्त केले. माजी शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्या बद्दल सर्वांचे आभार मानले

विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेतील केलेल्या गमतीजमती ची मजा सांगितली. आलेल्या सर्व मान्यवरांना चहा नाश्ता दुपारचे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन त्या बॅच मधील विद्यार्थी श्री. पंकज पाटील प्रास्ताविक श्री. प्रशांत पाटकळे व निरोप समारंभ रूपा पुरंदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. दशरथ नागरगोजे यांनी मानले.

या कार्यक्रमासाठी श्री. गणेश जगताप श्री. स्वप्निल कंदले श्री. राहुल निंबाळकर श्री. स्वप्निल अचलारे श्री. विनोद मोरे श्री. विनोद माने श्री. विपुल व्होरा श्री. दत्ता पवार अनिता ढोपे, सारिका शहा वर्षा काळे व फरिदा जमादार यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे या शाळेत शिकणारे विद्यार्थी श्री. दिपक रासकर श्री. पंकज पाटील श्री. राहुल निंबाळकर हे याच शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .

शिल्लक राहिलेल्या रक्कम पैकी शाळेसाठी 6 नग ऑफिस खुर्च्या ( chairs ) सप्रेम भेट दिल्या. त्या बद्दल शाळेचे प्राचार्य श्री.‌हनुमंत कुंभार सर यांनी आभार मानले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026
*खडकवासला कालव्याचे  मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा :  अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

*खडकवासला कालव्याचे मदनवाडी तलाव व 36 क्रमांकाच्या वितरितेला पाणी सोडा : अन्यथा जलसंपदा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन व रास्ता रोको करणार- सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांचा इशारा*

May 22, 2026
*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन  बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

*अहो मामा तुम्ही कृषिमंत्री झालात , अन बापू तुम्ही चेअरमन झालात.. एक वर्ष संपले…..छत्रपतीच्या स्वीकृत संचालक नियुक्तीचा मुहूर्त कधी काढणार…. ?*

May 3, 2026
*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

*ओम काॅम्प्युटर्स भिगवण येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 2, 2026
*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देशातील सर्व उमेदवारांचे मताधिक्याचे विक्रम मोडून बारामती विधानसभा पोट निवडणुकीत विजयी होणार*

May 4, 2026

*भिगवण येथील ओम काॅम्प्युटर्स येथे MS-ACIT परीक्षा उत्साहात*

May 1, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
तुषार झेंडे पाटील, यांची जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती

उजनी धरणात बोट उलटून झालेल्या दुर्दैवी घटनेस जबाबदार असलेल्या जलसंपदा व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची व या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत देण्याची मागणी

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group