इंदापूर ता. 21 : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून म्हसोबाची वाडी येथील चांदगुडे वस्तीवरील वाढीव विद्युत रोहिंत्राचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
येथे यापूर्वी असणाऱ्या कमी आश्व शक्तीच्या डीपीवर विजेचा अतिरिक्त भार होता. त्यामुळे सतत वीज पुरवठा खंडित होत होता. यावेळी घरगुती वीज पुरवठ्यासाठी वाढीव शंभर के व्ही चे रोहित्र मिळावे अशी मागणी श्री भरणे यांच्याकडे फोन द्वारे व समक्ष भेट घेऊन ग्रामस्थांनी केली होती.
यानुसार श्री भरणे यांनी याची तत्काळ दखल घेऊन जिल्हा नियोजन समितीतून चांदगुडे वस्तीसाठी वाढीव 100 के व्ही चे रोहित्र मंजूर केले व नुकतेच ते बसवण्यात आले आहे.
याशिवाय गावांसाठी आणखी वाढीव दोन शंभर अस्वशक्तीचे डीपी मंजूर करण्यात आलेले आहेत. ते देखील आगामी काळात लवकरच बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.