• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. *दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*” *भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन* *इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड* *आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन* *सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

Oplus_17956866

इंदापूर, दि. 21 : इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड उत्साहात संपन्न झाली.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापती, उपसभापती, तज्ज्ञ संचालक तसेच निमंत्रित संचालक पदांच्या निवडी आज इंदापूर येथील संस्थेच्या कार्यालयात सहाय्यक निबंधक श्री. शिवरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बिनविरोध पार पडल्या.

संस्थेचे मावळते सभापती श्री. अनिल शिंदे व उपसभापती सौ. संजीवनी गरगडे यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदांवर या निवडी करण्यात आल्या.

यामध्ये सभापतीपदी इंदापूर गटाचे प्रतिनिधी सन्माननीय श्री. प्रशांत घुले यांची, तर उपसभापतीपदी बावडा गटाचे प्रतिनिधी श्री. विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच तज्ज्ञ संचालक म्हणून काझड केंद्राचे केंद्रप्रमुख व सणसर बीटचे विस्तार अधिकारी सन्माननीय सांगळे साहेब यांची, तर दुसरे तज्ज्ञ संचालक म्हणून काटी केंद्रातील आदर्श शिक्षक श्री. मिलिंदजी देटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याशिवाय निमंत्रित संचालक म्हणून सन्माननीय भोसले वस्तीचे उपक्रमशील शिक्षक श्री.समाधान भोंग सर यांचीही एकमताने निवड करण्यात आली.

यावेळी मावळते सभापती श्री. अनिल शिंदे यांनी आपल्या कार्यकाळातील विविध विकासकामांचा आढावा घेत, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेला महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे विवेचन केले. नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब नरुटे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. शिक्षक संघाचे नेते श्री. दत्तात्रेय तोरस्कर सर व शिक्षक भारतीचे अध्यक्ष श्री सतीश शिंदे सर यांनीही नूतन सभापती, उपसभापती व संचालक मंडळाला शुभेच्छा देत संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. संस्थेचे माझी सभापती व संचालक यांनी नवनिर्वाचित सभापती उपसभापती यांना शुभेच्छा दिल्या तसेच उपस्थित नेतेमंडळी व कार्यकर्ते यांच्याकडूनही शुभेच्छांचा वर्षाव सभापती उपसभापती यांच्या वर करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक श्री. सचिन देवडे यांनी केले, तर जुन्या पेन्शन संघटनेच्या माजी अध्यक्ष श्री. सचिन दराडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या निवड प्रक्रियेस इंदापूर तालुक्यातील सर्व विभागांतील मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षक संघाचे पदाधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते. उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात बिनविरोध झालेल्या या निवडीमुळे उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त करत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

भिगवण येथील कला, विज्ञान, आणि वाणिज्य महाविद्यालयात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

August 1, 2026
*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून  अभिवादन*”

*दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सिद्धेश्वर निंबोडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून अभिवादन*”

July 23, 2026
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

July 21, 2026
*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी श्री. प्रशांत घुले सर, उपसभापती पदी श्री .विकास गायकवाड यांची बिनविरोध निवड*

July 21, 2026
*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

*आदर्श राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक श्रीकृष्ण साळुंखे यांचे दुःखद निधन*

July 16, 2026
*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

*सिद्धेश्वर निंबोडी परिसरात मोफत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराला प्रतिसाद*

June 7, 2026

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व  माध्यमिक विद्यालयात  ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

*भिगवण येथील डॉ. चंद्रकांत खानावरे आदर्श विदया मंदिर व माध्यमिक विद्यालयात ग्रंथ दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन*

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group