विनायक चांदगुडे
पुणे ता. 22 :
उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या दोन दिग्गज नेत्यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.
ही मैत्री इतकी घट्ट आहे की आज दोघांच्याही जन्मदिवसाच्या दिवशी दोघेही एकाच वेळी दोघेही सत्तेत आहेत व दोघेही उपमुख्यमंत्री या एकाच पदावर कार्यरत आहेत. या दोन्ही नेत्यांचा वाढदिवसही आज एकाच दिवशी आहे.
त्यामुळेच महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राजकारणात यापूर्वी कधीही व कोणाचाही बाबतीत न येणारा दुर्मिळ योग आज या दोघांच्या बाबतीत महाराष्ट्राला अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे या दोघांच्या आजच्या दिवशी जुळून आलेल्या या दुर्मिळ योगाचीच आज संपूर्ण राज्यात चर्चा होत आहे.
आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब व शिवसेना पक्ष प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आणि स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहिती आहे. त्यामुळेच तर या सर्वांची मैत्री राज्यात सर्वाधिक चर्चिली जात होती.
परंतु या सर्वांची घट्ट मैत्री जरी असली तरी या सर्वांचे पक्ष वेगवेगळे होते. व यांचे जन्मदिवस वेगवेगळे होते.
परंतु विशेष बाब म्हणजे एकाच वेळी स्वर्गीय विलासराव देशमुख व स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना मैत्री असूनही एकाच वेळी सत्तेत कधी एकत्र येता आले नाही.
परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात यांच्या बाबतीत मात्र एकाच दिवसी वाढदिवस व एकाच वेळी सत्तेत व एकाच पदावर दोघेही कार्यरत असण्याचा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील दुर्मिळ योग आहे.
यापूर्वी 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. व सरकार स्थापन केले होते. त्यामुळे असा योग मागील चार वर्षात येईल. असे वाटत होते परंतु अवघ्या तीन दिवसातच पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे भविष्यात कधीही पवार व फडणवीस एकाच वेळी सत्तेत येतील अशी शक्यता कधीच नव्हती.
.परंतु ये दोस्ती हम नही तोडेंगे हे वाक्य खरे ठरत पुन्हा जवळपास चार वर्षाच्या कालावधीनंतर पवार व फडणवीस यांचा योगायोग पुन्हा जुळून आला आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सध्याच्या महायुती सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार हे दोघेही 22 जुलै रोजी वाढदिवस असणारे दोघेही एकाच वेळी सत्तेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत.
असा यावर्षी 22 जुलै 2023 रोजी जुळून आलेला राज्याच्या राजकारणातील दुर्मिळ योगायोग केवळ आजच्या दिवशी पाहायला मिळेल की पुढील वाढदिवसापर्यंत दोघांपैकी कोणाचे तरी मुख्यमंत्रीपदावर प्रमोशन होणार का ? आजच्या सारखीच दोघांच्या उपमुख्यमंत्री पदाची स्थिती पुढील वर्षीही 22 जुलै 2024 रोजी कायम राहणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
————————————-
चौकट.
अजित दादांच्या बाबतीत या पंचवार्षिकमध्ये हाही योगायोग येईल का?
सन 2019 ते 2024 या विधानसभेच्या पंचवार्षिक कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, त्यानंतर उपमुख्यमंत्री झाले आहेत.तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते व त्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आहेत .
त्यामुळे अजित पवार यांचा केवळ मुख्यमंत्रीपदाचा अपवाद वगळता श्री. पवार व श्री. फडणवीस या दोघांनाही या पंचवार्षिक मध्ये समान पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे एकाच वेळी सत्ता, वाढदिवस व उपमुख्यमंत्री पद असा जसा दोघांच्या बाबतीत योग आला तसा या पंचवार्षिक मध्ये अजित दादांचा मुख्यमंत्रीपदाचा उरलेला योगायोग या पंचवार्षिक मध्ये पूर्ण होईल का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.