भिगवण ता.23: अखिल भारतीय मराठा महासंघ यांची आज दिनांक 23 जुलै 2023 रोजी सकाळी अकरा वाजता मध्यवर्ती कार्यकारणी मंडळाची तातडीची सभा आज होणार आहे.
विशाल सह्याद्री भवन .हॉटेल विश्व समोर टिळक रस्ता पुणे येथे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र जी कोंढरे साहेब ..राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय नरेंद्र अण्णासाहेब पाटील ..राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश देशमुख तसेच संयुक्त सरचिटणीस गुलाब दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
सदर मीटिंगमध्ये मागील सभेचा इति वृत्तांत वाचून कायम करणे. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नवीन सभासद अर्जांना मंजुरी व विभागीय जिल्हा. तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांची निवड करणे. फेर नियुक्ती करणे व नियुक्ती त्यांना मंजुरी देणे. तसेच सर्व विभागीय जिल्हा तालुका पातळीवर पदाधिकाऱ्यांच्या कामाचा व जिल्हा निहाय शाखांच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणे ..इमारत पुनर्विकास घोटाळा संदर्भात चर्चा न्यायालयीन प्रक्रियेची माहिती व निर्णय.. सन 2021- 2022 व 2022- 2023 च्या वार्षिक ताळेबंद व जमाखर्चास मंजुरी देणे .पुढचे पाऊल पुस्तक संदर्भात आढावा जाहिराती संकलन करणे.. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या उद्देश पूर्तीसाठी शासनाकडे प्रलंबित मागण्याचा पाठपुरावा करणे बाबत ..तसेच आगामी वर्षाच्या नियोजनात्मक खर्चाची तरतूद व मंजुरी… वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याबाबत चर्चा व निर्णय घेणे आणि अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने येणाऱ्या विषयावर चर्चा व निर्णय घेणे याबाबतचे विषय सदर मीटिंगमध्ये चर्चिले जाणार असून सदर मिटींगला संपूर्ण राज्यातील जिल्हा व शहर आणि तालुका पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड .पांडुरंग जगताप यांनी दिली
सदर पत्रकार परिषदेला इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर सर पुणे जिल्हा सरचिटणीस विक्रम बाबा पवार भिगवन शाखा अध्यक्ष छगनराव वाळके .. भिगवण शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते…