भवानीनगर ता. 26 : भवानीनगर येथील श्री.छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार द्या अशी आग्रही मागणी छत्रपतीचे संचालक ॲड रणजीत निंबाळकर यांनी केली आहे.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी 12 जुलैला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीवर 20 जुलै पर्यंत 595 हरकती दाखल झाल्या होत्या . यावर 21 जुलैपासून सुनावणी सुरू आहे.
यात प्रामुख्याने 15 ते 16 हजा सभासद मतदार कमी करण्याच्या संदर्भात तक्रारी आहेत. परंतु सरकारच्या नवीन अध्यादेशानुसार 22 हजार 990 हे सभासद पात्र असल्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.
तर मयत असणारे 4 हजार 266 मतदार मुळ यादीतून वगळले आहेत. तर 248 हे आज्ञानपालकर्ता तर 2 हजार 400 सभासद थकबाकीदार म्हणून वगळळीले आहेत. एकूण 22 हजार 990 मतदार हे प्रारूप यादीमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमध्ये आहेत.
परंतु थकबाकीदार. शेअर्स ची थकबाकी .ऊस न घालण्याच्या कारणाने यांना सभासदांची नावे मतदार यादीतून वगळण्यात यावीत असे आक्षेप दाखल झाले आहेत. परंतु हे चुकीचे आहे.
असे झाल्यास कारखान्याचे मतदार सभासदांची संख्या ही 8000 वर येणार आहे व जवळपास पंधरा हजार सभासद हे मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
परंतु यातील हजारो सभासदांना दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस घालणे शक्य नव्हते तसेच जवळपास तीन वर्षाच्या कोरोनाच्या काळामुळे सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणे शक्य नव्हते.
अशा स्थितीत सभासदांना मतदानाचा हक्क न मिळाल्यास व सभासदांनी कारखान्याकडे असलेली शेअर्सची रक्कम मागणी चालु केल्यास कारखाना ही रक्कम कोठून देणार ? असा देखील मोठा प्रश्न उपस्थित होणार आहे.
तसे झाल्यास संस्थेचे भाग भांडवल कमी झाल्यामुळे कारखान्याला कर्ज मिळण्याची प्रकिया अडचणीची होऊ शकेल त्यातून सहकारी कारखानदारी अडचणीत येईल.त्यामुळे कारखान्याच्या 22 हजार 990 सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणे गरजेचे आहे.
त्यासाठी माझ्यासह अध्यक्ष प्रशांत काटे उपाध्यक्ष अमोल पाटील व सर्व संचालक मंडळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत आहेत . असेही श्री निंबाळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले