भिगवण ता.1 : इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार भगवान गायकवाड यांना साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती कोंढार चिंचोली तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
विजयकुमार गायकवाड यांनी ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाच्या उभारणीसाठी सातत्याने बातम्यांचा पाठपुरावा करून प्रशासनाला जाग आणली होती. त्यांच्या अभ्यासपूर्ण व जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या लिखाणामुळे रखडलेल्या डिकसळ कोंढार चिंचोली पुलाच्या नवीन उभारणीसाठी गती मिळाल्यामुळे करमाळा तालुक्याच्या वतीने त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा. चेअरमन दिग्विजय बागल बारामती ऍग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामदास झोळ करमाळा पंचायत समितीचे सदस्य नागनाथ लकडे किरण कवडे, कोंढार चिंचोलीचे सरपंच शरद भोसले, आजिनाथ कारखान्याचे मा.संचालक राजेंद्र धांडे मकाई सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक नंदकुमार भोसले मा. सरपंच देविदास साळुंखे, प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज लांडगे अध्यक्ष भरत लांडगे उपाध्यक्ष मनोज कांबळे सुरेश कांबळे आदि मान्यवर व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.