शेटफळगडे ता.2 : म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे विहिरीचे रिंगेचे काम सुरू असताना विहिरीची रिंग कोसळून चार मजूर गाडले गेले आहेत हे सर्व मजूर बेलवाडी येथील रहिवासी आहेत. घटनास्थळी एनडीआरएफची पथके दाखल झाली आहेत
सकाळपासून मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी भिगवण पोलिसांचा बंदोबस्त आहे विहिरीची खोली जवळपास 90 फूट आहे तर गोलाई जवळपास दीडशे फूट होती
मंगळवारी दुपारी पाच वाजता सुमारास घटना घडली असा अंदाज आहे मात्र निर्मनुष्य भाग असल्याने सुरुवातीला पहिल्या दोन-तीन तासात कोणालाच काही समजले नाही. मजूर घरी परत येत नाहीत म्हणून शोधाशोध सुरू झाली अखेरीस रात्री नऊ वाजता आमदार दत्तात्रय भरणे यांना मजुरांच्या नातेवाईकांनी संपर्क केला.
माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी प्रांताधिकारी पोलिस अधिकारी यांना सूचना दिल्या तसेच घटनास्थळी सचिन सपकाळ व अनिकेत भरणे यांनी तात्काळ पाठवले घटनेचे गांभीर्य ओळखून श्री भरणे यांच्या सूचनेनुसार तत्काळ 210 असूशक्तीच्या पाच पोकलेन मशीन मागवून सर्व यंत्रणा उभी केली
आज पहाटे एनडीआरएफची पतके दाखल झाले असून जवळपास पाच दोनशे दहा अश्वशक्तीच्या साह्याने मशीनच्या सहाय्याने माती हटवण्याचे काम सुरू आहे तसेच टिपरही सुरू आहेत ढासळलेल्या मातीचे प्रमाण हे जास्त असल्याने अधिकाधिक यंत्रणा वाढवण्याचे काम चालू आहे
आज सकाळी पहाटे साडेपाच वाजता श्री भरणे यांनी घटनास्थळाला प्रत्यक्ष भेट दिली आज दिवसभर तेे घटनास्थळी आहेत लागेल तीी यंत्रणा मागवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत
तसेच बेलवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री संपर्क केल्यावर र्श्री भरणे हे स्वतः अनिकेत भरणे व सचिन सपकाळ यांच्याा संपर्कात होते हे रात्रभर या ठिकाणी थांबून होते यांच्या संपर्कात राहुल अधिकाऱ्यांना आदेश देत होते तसेच तहसीलदार श्रीकांत पाटील भिगवन चे पोलीस निरीक्षक दिलीप पवार हे देखील रात्रीपासून या ठिकााणी थांबून आहेत
तर आज घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे गणेश इंगळे प्रांत अधिकारी हेेेे देखील आज घटनास्थ थांबून आहेत अजून मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून संध्याकाळपर्यंत सर्व्व चित्र होईल असा अंदाज आहे
विशेष बाब म्हणजे दररोज या ठिकाणी 11 ते 12 कामगार कामासाठी येत होते परंतुुु काल पौर्णिमा असल्याने सात कामगार आलेेे नाहीत त्यामुळे मंगळवारी जे चार जण कामासाठी आले त्यांच्या बाबतीत ही दुर्घटना घडली