• Contact Us
  • Home
  • Privacy Policy
चौफेर न्यूज
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
चौफेर न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Breaking
*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी* *स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा* *राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक* *आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष* *रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील* इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अखेरीस २७ वर्षानंतर मार्गाला लागणार

योजनेच्या कामास लवकरच सुरुवात योजनेत समाविष्ट 17 गावांपैकी इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी तर बारामती तालुक्यातील सावळ या गावाचे सर्वाधिक क्षेत्र या योजनेद्वारे येणार ओलिताखाली

लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेचे इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाहिलेले स्वप्न अखेरीस २७ वर्षानंतर मार्गाला लागणार

शेटफळगढे, ता २. : गेल्या २७ वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेच्या ३४८ कोटी ११ लाख रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेची सव्वादोनशे कोटी रुपयांची निविदा ही जलसंपदा विभागाने काढली आहे .या योजनेद्वारे इंदापूर व बारामती या दोन्ही तालुक्यातील १७ गावातील ७ हजार २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र ही योजना पूर्ण होण्यासाठी अजूनही पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे त्यामुळे गेल्या २७ वर्षापासून शेतीच्या पाण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही पाच वर्ष वाट पाहावीच लागणार आहे २४ नोव्हेंबरच्याला लाकडी येथे पार पडलेल्या पर्यावरण एक विषयक जनसुनावणीच्या दरम्यान स्पष्ट झाले आहे.
१९९५ पासून आजवरच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत विशेष करून इंदापूर तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या योजनेची चर्चा झाली. मात्र प्रत्यक्षात या योजनेस मान्यता मिळाली नाही. योजनेस मान्यता मिळण्यास तब्बल २६ वर्ष गेली होती .त्यानंतर वर्षभर वेगवेगळी प्रक्रिया पूर्ण करण्यास गेले आहेत. आता या योजनेचे कामही काही दिवसातच सुरू होणार असले तरी या योजनेसाठी लागणारी जमीन भूसंपादन करणे व काम पूर्ण करणे यासाठी अजूनही पाच वर्षाचा कालावधी जाणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी येण्यासाठी अजूनही वाटच पहावी लागणार आहे
———————————————-
(१)प्रकल्पाची आवश्यकता- या १.भागात पर्जन्यमान कमी आहे आणि इतर कोणत्याही सिंचन योजनेचा समावेश नाही
२. लाभार्थी क्षेत्रातील १७ गावांना दीर्घकाळापासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे
३. शेतीस चांगला वाव असूनही, भूजल पातळी कमी असल्यामुळे शेतीचे उत्पन्न पुरेसे येत नाही
———————————————-

(२) प्रकल्पाचे फायदे-
१.कृषी उत्पादनात वाढ.
उत्तम/अधिक पशुखाद्याची उपलब्धता.
२.कृषी प्रक्रिया उद्योगांमध्ये वाढ.
शेतकऱ्यांच्या कमाई क्षमतेत वाढ.
३.स्थानिकांच्या राहणीमानात सुधारणा.
४. दुय्यम रोजगाराच्या संधींमध्ये वाढ.
———————————————-
(३) इंदापूर तालुका एकूण सिंचन क्षेत्र हेक्टर.
लामजेवाडी -२३८.१ शेटफळगढे – १३८.८ म्हसोबाचीवाडी -७५६.६ निरगुडे -६६५.२ लाकडी -७४०.७ निंबोडी -४५५.५ शिंदेवाडी -५४३.८ काझड – ५१३.७ वायसेवाडी -१६२.३ धायगुडेवाडी (अकोले)- १२२.७.
—————————————
बारामती तालुका एकूण सिंचन क्षेत्र हेक्टर
कटफळ -७४४.८ सावळ – ९०४.९ जैनकवाडी – ४७७.७ पारवडी – २०८.८ कन्हेरी – २५७.८ काटेवाडी – २१६.१ गाडीखेल – १०२.४ —

————————————

(४)प्रकल्पाचे स्वरूप
प्रायोजक : जलसंपदा विभाग, उज्जनी कालवा विभाग क्र. ८, महाराष्ट्र शासन
प्रकल्पाचे नाव : लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना (लाभार्थी क्षेत्रः १९१५४ हे.) कुंभारगाव
श्रेणी :1(c) नदी खोरे प्रकल्प
प्रकल्पाची जागा : कुंभारगाव, ता. इंदापूर, जि. पुणे
लाभार्थी जिल्हा : पुणे जिल्ह्यातील इंदापूर -१० आणि बारामती तालुका – ७ गावाचा समावेश
पाण्याचा वापर : ०.९० अ.घ.फू. (२५. ३४९ घन मी.)
लाभार्थी क्षेत्र : १९१५४ हेक्टर
सिंचन क्षेत्र : ७२५० हेक्टर
स्तोत्र : उजनी जलाशय
सिंचन क्षमता (पीक क्षेत्र) : १०,००५ हेक्टर
प्रकल्पाची एकूण किंमत : रु. ३४८१०.६३ लाख
वितरण प्रणालीची लांबी : १९७. ३२१ किमी
आवश्यक जमीन : ३४.२२ हेक्टर. खाजगी जमीन
—————————————————-+

(५) या प्रकल्पासाठी लागणारी एकूण ३४.२२ हेक्टर जमीन संपादित करण्यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली आहे . जमीन संपादन करणे व या योजनेचे संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी अजून पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे जमीन संपादन करण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे त्यामुळे त्याचीही मान्यता लवकरच मिळून प्रत्यक्ष कामाला काही दिवसातच सुरुवात होणार आहे.


(६) योजनेचे स्वरुप-
(१) या योजनेसाठी उद्भव उजनी धरणाच्या जलाशयातून मौजे कुंभारगाव येथून पाणी उचलण्यात येणार आहे. याकरिता ०.९० अब्ज घनफूट (२५.४८४ दलघमी) पाण्याची तरतूद करण्यात आली आहे.
(२) या योजनेद्वारे पहिल्या टप्प्यामध्ये ५०.१० मीटर व दुसऱ्या टप्प्यामध्ये अनुक्रमे ५१.२० मिटर व ७३.२० मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलून बंदिस्त नलिका का प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला दिले जाणार आहे.
(३) कुंभारगाव येथे योजनेचे पहिले तर शेटफळगढे येथे योजनेचे दुसरे पंपगृह केले जाणार आहे कुंभरगाव येथे ७६५ अश्‍वशक्तीचे ४ तर शेटफळगढे येथे ५४० अश्‍वशक्तीचे २ तर ६४० अश्वशक्तीचे ३ विद्युत पंप बसविण्यात येणार आहेत.
(४) लामजेवाडी येथे योजनेचे पहिले वितरण कुंड व जैनकवाडी येथे योजनेचे दुसरे वितरण कुंड बांधले जाणार आहे.
(५) व यातून बंदिस्त नलिका वितरण प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाला पाणी दिले जाणार आहे —————

विनायक चांदगुडे

विनायक चांदगुडे

गेल्या 23 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत महाराष्ट्र शासनाचे पत्रकारितेतील विविध विषयावरील लिखाणा संदर्भात पाच पुरस्कार मिळालेले आहेत तसेच पाच पुस्तके ही प्रकाशित झालेली आहेत.

ताज्या बातम्या

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी*

September 24, 2025
*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी  गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

*स्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा*

September 22, 2025
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

*राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपले आजचे सर्व दौरे केले रद्द , इंदापूर मध्ये 14 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने पाहणी करण्यासाठी सणसर कडे रवाना, तासाभरात अधिकाऱ्यांची तातडीची बैठक*

September 15, 2025
तिजोरी राज्याची परंतु इंदापुरात भरणे व पाटील यांनी  रंगविली चर्चा चावीची

*आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील समर्थक इच्छुक उमेदवारांचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष*

August 23, 2025
*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे  ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

*रक्तदानाचे पुण्य कार्य नव्या युवापिढीने हाती घेतले आहे ही बाब कौतुकास्पद – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील*

August 23, 2025
इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

इंदापुरातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गणावरील हरकतींचे निराकरण झाल्यानंतर 18 ऑगस्टला अंतिम होणार गट व गण रचना : नंतरच इच्छुकांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीला येणार वेग

July 21, 2025

बातम्यांसाठी संपर्क

विनायक पांडुरंग चांदगुडे
(संपादक – चौफेर न्यूज)
मोबाईल- 9011017882
मेल आयडी – vpchandgude@gmail.com

Next Post
इंदापूर तालुक्यातील 8 रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून   19 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर- माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे

आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरच्या जनतेला दिले पंचामृताचे बहुमूल्य गिफ्ट

  • Home
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकारण
  • कृषी
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2023. Website powered by ContentOcean Infotech Private Limited.

कॉपी करू नका.
Join WhatsApp Group