बारामती ता. 16 : बारामती तालुक्यातील काटेवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक व राष्ट्रीय आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक कै. श्रीकृष्ण विठ्ठलराव साळुंखे वय (७५) यांचे अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
श्रीकृष्ण विठ्ठल साळुंखे हे बापू या नावाने परिचित होते. पुरंदर तालुक्यातील मावडी गाव असूनही बारामती तालुक्यात आपल्या सेवेचा सर्व कालावधी व्यथित केला.
वानेवाडी, चांदगुडेवाडी आंबी सांगवी पवईमाळ माळेगाव व काटेवाडी या ठिकाणी त्यांनी आपल्या सेवेचा सर्व कालावधी पूर्ण केला.
जिल्हा परिषद शाळा पवईमाळ येथे कार्यरत असताना त्यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने 2001 साली राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.
शिक्षण क्षेत्रातील एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यामागे पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी रविवारी 19 जुलै रोजी बारामती येथे जुन्या कचेरी जवळ सकाळी नऊ वाजता होणार आहे.







